मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर, आझाद मैदानात आंदोलनावर ठाम, वाशीत निर्णय घेणार

नवी मुंबई : मनोज जरांगे हे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाले आहेत. वाशी येथील बाजारसमितीच्या आवारातील झेंडावंदन कार्यक्रमाला मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. मनोज जरांगे यांच्या हस्ते झेंडावंदन झालं आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीनं शिष्ठमंडळ देखील मनोज जरांगे यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या पायाला सूज असल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांना आराम करण्याची गरज असल्याचं बोललं जातंय. मागील काही दिवस पायी दिंडी मुळे जरांगे यांना झोप मिळत नव्हती. मनोज जरांगे पाटील सध्या वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये निवासासाठी आहेत.

राज्य सरकारच्यावतीनं शिष्टमंडळाची आज देखील मनोज जरांगे यांच्याशी चर्चा होईल. सरकारचा मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्ठमंडळातील चर्चेनंतर आंदोलनाचं पुढील चित्र स्पष्ट होईल. आजच्या चर्चेतून समाधान झालं नाही तर ते मुंबईकडे निघतील, अशी माहिती आहे.
मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा घेतला निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांकडून अपेक्षा

मनोज जरांगे नवी मुंबईतील वाशीत साडे चार वाजता दाखल झाले. काल रात्री मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी राज्य सरकारच्या शिष्ठमंडळासोबत वाशीत चर्चा करणार असल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं आलेला आहे. मुख्यमंत्र्यांना कोण मार्ग काढू देत नाही का हा संशय येत आहे. सगेसोयऱ्यांना लाभ देताना एवढा वेळ का लागतोय, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. एवढा मोठा समाज मुंबईत येत असताना राज्य सरकारनं विचार करायला पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले.

आझाद मैदान सर्वांचंच आहे. लोकशाही मार्गानं आंदोलन करत आहोत. मुंबईत जाणार आहे आझाद मैदानावर आंदोलन करणार, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल; लाखोंचा जनसमुदाय अवतरला, समाज बांधवांकडून मोफत अन्नदान
आम्ही सात महिने गावात बसलो होतो, आता आम्हाला पण समजून घ्यायला हवं. मुंबईला येणार ही घोषणा करुन एक महिना झाला तरी यांनी मनावर घेतलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घ्यावं, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाच्या नोंदी असून त्यांना प्रमाणपत्र मिळावं, असं मनोज जरांगे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटायला येऊन तोडगा काढायला पाहिजे होता. ते आले नाहीत पण त्यांनी येऊन तोडगा काढायला हवा होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आहे, पोलीस बांधवांना व्यवस्थित सूचना द्याव्या, अशी विनंती आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
वंचित अखेर मविआच्या बैठकीला हजर राहणार, जयंत पाटलांनी पुढचं पाऊल टाकलं अन् मार्ग निघाला, नेमकं काय घडलं?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

manoj jarangemanoj jarange patilMaratha Reservationएकनाथ शिंदेनवी मुंबई बातम्यामनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षणमहाराष्ट्र सरकार
Comments (0)
Add Comment