एरंडोल ता.प्रतिनिधी (शैलेश पांडे )
सविस्तर वृत्त असे की…
काल दि.८ सप्टेंबर रोजी तालुक्याचे आमदार चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील शासकीय आश्रय शाळेत आदिवासी टायगर सेना व अभिनव संस्था समिती जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी महाराजस्व अभियान या उपक्रमांतर्गत तालुक्यातील १५ खेड्यातील आदिवासी समाज बांधवांकडून शासन परिपत्रका नुसार कमीत-कमी व आवश्यक इतके कागदपत्रे घेऊन आदिवासी भिल्ल समाज बांधवांना ४८० रेशनकार्ड व ३०० जातीचे दाखले (प्रमाणपत्र) वाटप करण्यात आले.
याकार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आ. चिमणरावआबा पाटील, एरंडोल प्रांताधिकारी विनयजी गोसावी साहेब,तहसीलदार सौ. सुचिता चव्हाण मॅडम , जिल्हा परिषद सदस्य मंगलसिंग गायकवाड , महिला आघाडी प्रमुख महानंदाताई पाटील, आदिवासी टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष एरंडोल तालुकाध्यक्ष होते,
आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ता पंढरीनाथ मोरे यांनी समाजाला मार्गदर्शन केले समाजाच्या विविध समस्यांची जाणीव करून दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भूषण घेतील तसेच जिल्हा कार्याध्यक्ष राज्याची मालचे, जिल्हा उपाध्यक्ष ,सुनील मोरे तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे ,पारोळा तालुका अध्यक्ष रवी माळीसह सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
याकामी शासन आपल्या दारी अभियानात आदिवासी समाज बांधवांना तालुक्याच्या नूतन तहसीलदार सौ.चव्हाण व पुरवठा अधिकारी यांनी मदत केली..!