जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे! अपघाताने पाय गमावले, पण जिद्द सोडली नाही, हाताने सायकल चालवणारा अवलिया

म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक: भारतात हाताने सायकल चालवणे हा एक आश्चर्यकारक अनुभव आहे. इथे आल्यावर सायकल चालवून मला खूप आनंद मिळाला. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्टीफन वुर्मन यांनी मनोगत व्यक्त केले.

सायकलॉथॉनमध्ये जर्मनी येथील स्टीफन वुर्मन हा सायकलिस्ट सहभागी झालेला आहे. वयाच्या सतराव्या वर्षी अपघातानंतर पॅरालिसिस झालेला असूनही जिद्द, चिकाटीच्या बळावर स्टीफन तीनचाकी सायकल झोपून अतिशय वेगाने हाताने पॅडलिंग करून चालवतो. या विशेष सायकलिस्टचे गुरुवारी नाशिकमध्ये दुपारी दोन वाजता आगमन झाले. नाशिकरोड येथील शिवाजी पुतळ्याजवळ औक्षण करून फेटा व हार घालून स्वागत करण्यात आले. या स्वागताने स्टीफन भारावून गेला.

‘जय श्रीराम, जय महाराष्ट्र’ या घोषणा दिल्या. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष डॉ. मनीषा रौंदळ, संचालक सूर्यकांत आहेर, मयूर कुलकर्णी, के. एल. जगताप, विनायक वारुंगसे हे सायकलिस्ट उपस्थित होते. स्टीफनसोबत चार बॅकअप कार, ॲम्ब्युलन्स, एक टेम्पो या सुविधादेखील असतात. रस्तासुरक्षेची काळजी आयोजकांच्या वतीने घेतली जाते. स्वागतानंतर स्टीफनसोबत नाशिक सायकलिस्टने नाशिक क्लब ते द्वारकापर्यंत सायकलिंग केली. अपघातामुळे वुर्मन यांच्यावर ६५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

सायकलॉथॉनची सुरुवात २३ जानेवारी रोजी वाई, सातारा येथून झाली. पुणे, नारायणगाव-नाशिक ते मुंबई असा पूर्ण ५१५ किलोमीटरचा प्रवास राहणार आहे. या प्रवासादरम्यान रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग गरजूंना कृत्रिम हात, पाय मोफत दिले जाणार आहेत. दिव्यांगांप्रति एक चांगली भावना व त्यांच्या असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी असलेल्या सुविधांचा वापर करावा, याची जनजागृती व्हावी या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात येते.

पाच वर्षांच्या मुलाला वारंवार गंगेत बुडवून मारलं, घटनेने संपूर्ण हरिद्वार हादरलं, कारण वाचून संतापाल
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

nashik cyclothon newsnashik cyclothon storynashik news livenashik news todayparalyzed cyclist stephen woormanride cycle by hands
Comments (0)
Add Comment