चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात; मराठा समाज उद्या घेणार फायनल निर्णय, गुलाल उधळण्यासाठी मुंबईतच येणार- जरांगे

नवी मुंबई: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या लाखो आंदोलकांचा मोर्चा आज नवी मुंबईतच थांबणार आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला उद्या सकाळी ११ पर्यंतची मदुत दिली आहे. तोपर्यंत सर्व आंदोलक नवी मुंबईतील वाशी येथेच थांबणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात जायचे की नाही याबाबतचा निर्णय उद्या सकाळी घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

अशा आहेत मागण्या

१)सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे पत्र- अध्यादेश काढा

२) न्यायालयात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलांना १०० टक्के मोफत शिक्षण द्या

३) आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा

४) आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

५) जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा

६) SEBC अंतर्गत २०१४च्या नियुक्त्या त्वरित द्या

७) वर्ग १ व २ आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या

राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या तर गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानावर जाणारच असे देखील जरांगे पाटील म्हणाले. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईतून जाणार नाही असे जरांगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान आझाद मैदानावर जाण्याबाबतचा निर्णय उद्या घेतला जाईल. तोपर्यंत इथेच वाशीत थांबण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

जरांगे पाटील यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-संपूर्ण देशाचे आपल्याकडे लक्ष, त्यामुळे जबाबदारीने वागा
– एक नोंद सापडली तर त्याचा फायदा ५० ते १५० जणांना फायदा मिळतो
-ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र मिळणार
-५४ लाख नोंदी सापडल्या
-अर्ज केला नाही तर प्रमाणपत्र मिळणार नाही
– ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याची सरकारची माहिती
– शिंदे समिती रद्द करायची नाही, मुदत एक वर्षाने वाढवण्याची मागणी, सध्या मुदत २ महिन्यांनी वाढवली
– प्रमाणपत्र नेमके कोणाला दिले याचा डेटा मागितला
– नोंदी मिळाल्यास सर्व सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, याबाबत अध्यादेश काढावा

Source link

jarange patilmaharashtra governmentMaratha Reservationmaratha reservation grमनोज जरांगे पाटीलमराठा समाज आरक्षण
Comments (0)
Add Comment