मुलगा हवा होता तिसरीही मुलगीच का झाली? पतीचा संताप, सासरच्यांकडून छळ, विवाहितेची पोलिसात धाव

परभणी: विवाहितेला दोन मुलीनंतर तिसरीही मुलगी झाली. त्यामुळे नवरा किशोर निर्मळ सह सासरचे सर्वच नाराज झाले. तुला तिसरी ही मुलगी का झाली? आम्हाला मुलगी नको, असे म्हणून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर माहेरातून ऑटो घेण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत घराबाहेर काढून दिले. विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचे नाव सविता किशोर निर्मळ (३७) असे आहे. सविता निर्मळ यांचे लग्न किशोर निर्मळ यांच्याशी रीतीरीवाजाप्रमाणे झाले. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने सासरच्यांनी चांगले नांदवले. नंतर मात्र शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात सुरुवात केली. सासरच्यांकडून होत असलेला त्रास सहन न झाल्याने यापूर्वीही सविता निर्मळ यांनी परभणीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात ४९८ A अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण त्यानंतर ते प्रकरण आपासात मिटवल्यानंतर कोर्टामध्ये तसाच जबाबही दिला होता.केस मिटवून घेण्यात आली होती.
भाची घरात चहा पीत होती; तेवढ्यातच मामाचे क्रूर कृत्य, अत्याचाराच्या घटनेनं अमरावती हादरलं
केस मिटल्यानंतर पुन्हा सविता आणि किशोर यांचा संसार सुखाने चालू होता. पण जुलै २०१४ मध्ये सविताला तिसरी मुलगीच झाली. तिसरी मुलगी झाल्याने सविताचा पती किशोर आणि त्याची आई आणि बहीण सर्वच नाराज झाले. नवरा किशोर निर्मळ म्हणाला की तुला तिसरी मुलगी का झाली? मला मुलगी नाही पाहिजे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. त्याचबरोबर सासू द्रोपदाबाई निर्मळ यांनीही आपल्या मुलाला सांगून सविताला घराबाहेर हाकलून दे, तुझे लग्न मी लावून देते असे म्हणू लागल्या.

सविताचा शारीरिक आणि मानसिक छळ पती आणि सासूने सुरू केला. त्रास सुरू असतानाच पुन्हा पती किशोरने सविताला ऑटो घेण्यासाठी माहेरातून पन्नास हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांची परिस्थिती बिकट असल्यामुळे सविता हा त्रास सहन करत होती. सासू द्रोपदाबाई या सविताला स्वयंपाक करू देत नसे. तसेच उपाशी पोटी ठेवून घरातील सर्व कामे करून घेत असत. सविता माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन येत नसल्याने पती किशोर याने सविताला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले

एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ अन् खांद्यावर प्रफुल पटेलांना बसवलं : संजय राऊत

त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. सविताने दुसऱ्यांदा या त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन गाठले. सुरुवातीला भरोसा सेल परभणी यांच्याकडे सासरच्या लोकांविरुद्ध अर्ज केला. पण तळजोड न झाल्याने नवा मोंढा पोलीस ठाण्यात नवरा किशोर निर्मळ सासु द्रोपदाबाई निर्मळ आणि नणंद भाग्यश्री काळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

harassing married woman in parbhaniparbhani crimeparbhani newsपरभणी बातमीपरभणीत विवाहितेचा छळविवाहितेचा छळ
Comments (0)
Add Comment