…तर महाविकास आघाडीला निवडणुकांत यश मिळणार; काय आहे अजित पवारांचा फॉर्म्युला?

हायलाइट्स:

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे
  • युती आणि आघाडीची नेमकी काय समीकरणे जुळून येणार?
  • अजित पवार यांनी मांडली भूमिका

मुंबई : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांत युती आणि आघाडीची नेमकी काय समीकरणे जुळून येणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकांबाबत भाष्य केलं आहे. ‘आपल्या मतांची विभागणी न होऊ देता आपण जागा वाटपामध्ये यशस्वी झालो तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडीकडे यायला निश्चितपणे मदत होईल,’ असं मत अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडलं आहे.

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याची प्रतिक्रिया विविध पक्षाच्या नेतृत्वाने व्यक्त केली आहे. कुणी काय स्टेटमेंट द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न व अधिकार आहे. पण उद्याच्या निवडणुकांना सामोरे जात असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवायची की दोघांनी की, स्वतंत्र लढवायची हा तिथल्या जिल्ह्याला अधिकार द्यावा,’ अशी भूमिकाही अजित पवार यांनी मांडली आहे.

nitesh rane on lookout circular: ‘अडचणी आमच्या नाही, ठाकरे सरकारच्या वाढणार’; लुकआऊट सर्क्युलरवर नितेश राणेंचा इशारा

‘आपण इथे बसून ठरवलं तर उदाहरणार्थ गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर इथली परिस्थिती काय असते ते माहीत नसतं. आपण त्यांच्यावर सोडलं तर ते या सगळ्याचा साखल्याने विचार करतात. तिथले लोक रोज राजकारण आणि समाजकारण करत असतात. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा. परंतु सध्या तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेतृत्त्वाकडून वारंवार स्वबळाचा नारा दिला जात आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने वारंवार एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि मनसे या नव्या युतीचीही चर्चा रंगत आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

ajit pawar latest newslocal body electionअजित पवारमहाविकास आघाडीराष्ट्रवादीस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
Comments (0)
Add Comment