राजे दबंग आहेत. मनाचा मोकळा, सच्चा राजा! असे आमचे राजे. असा भाऊ असला म्हणजे मला काय काळजी आहे, मला कशाची का चिंता नाही. जिचे माहेर छत्रपतींचे घर आहे तिला कशाची चिंता आहे. हे ऋणानुबंध असेच राहावे, असे उद्गार पंकजा मुंडे यांनी काढतात उदयनराजे भोसले यांना गहिवरून आले. नक्षत्र महोत्सव २०२४ चे आज जिल्हा परिषदेच्या मैदानावर माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्याचे काय संबंध आहेत आणि त्याचे ऋणानुबंध कसे वाढत गेले हा पंकजाताई मुंडे यांनी डोळ्यासमोर एक भूतकाळातील डोळ्यासमोर एक चित्रपटात उभा केला. हे ऐकून उदयनराजे भोसले यांना आनंदाश्रू अनावर झाले आणि गहिवरून आले.
उदयनराजे यांची आठवण सांगताना पंकजाताई म्हणाल्या, राजे लहान असताना आमच्या गावी आले होते, तेव्हा मी लहान होते. आमच्या गावात राजे आले…राजे आले… अशी चर्चा झाली. अत्यंत लहान असल्यापासून मुंडेसाहेबांनी उदयनराजेंवर खूप प्रेम केलं. आज साताऱ्यात आल्यावर माहेरला आले असं मला वाटतंय. मलाही वाटतं माहेरी जा. कोणावर तरी अवलंबून राहावं. उदयनराजे यांना बघितल्यावर नेहमी असं वाटतं, असा एक व्यक्ती आहे ज्याच्यावर अवलंबून राहू शकते.
राजेंची एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या, की मुलीची काळजी करायची नाही. अगदी मध्यरात्रीही हक्काने फोन कर, असे उदयनराजेंनी गोपीनाथ मुंडे यांना सांगितलं होतं. कोणी असं पाठीराख्या असलं की बर वाटतं, हे महत्त्वाचं आहे आणि ते राजेंकडे बघून वाटतं. त्यामुळे मी त्यांचा शब्द टाळला नाही. कारण माझ्या शिवशक्ती परिक्रमेला उंची मिळाली असेल तर ती राजे तुमच्यामुळेच! तुमच्या उपस्थितीने पहिला दिवस इतका उंचावर नेऊन ठेवला की ती फार मोठ्या प्रमाणात झाली.
मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाचा उदयनराजे उपस्थित होते. तेव्हा ते मंचावर उपस्थित राहिले. त्यावेळी ते इतके गहिवरले की एक दोन मिनिटं सभागृह स्तब्ध झालं होतं. समोर लाखो लोक उपस्थित होते आणि ही सभा पूर्ण गहिवरून गेली होती. काय हे प्रेम आहे, काय हे नातं आहे, असे त्या उदयनराजे भोसले यांचे कौतुक करताच उदयनराजेंचे डोळे पाणावले. आपण राजे असलो तरीही जनतेविषयी मन किती हळव आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.