मोठी बातमी! अंतरवली सराटीतील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. जरांगेंच्या संवादानंतर सरकारचं शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री उशीरा मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहे. यावेळी मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे घोषणा केली आहे. मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. तसेच पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे. ही बातमी मराठा आंदोलकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
मराठा आंदोलक एपीएमसीत; शेतकऱ्यांवर परिणाम, गैरसोय टाळण्यासाठी शासनाकडून उपाययोजना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राजकीय गुन्हे मागे घेण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठा आंदोलकांवरील राजकीय स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. याबाबत पत्रही जरांगे पाटील यांना देण्यात आले आहे. मात्र पोलिसांवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणते नवीन वळण मिळतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांसाठी डबेवाला संघटना पुढे सरसावली

दरम्यान नवीन अध्यादेश आणि ‘वर्षा’वरील बैठकीचा तपशील दिला जाणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे आधी अधिकारी या शिष्टमंडळामध्ये आहेत. दरम्यान मंगेश चिवटे यांनी नक्कीच चांगली आनंदाची बातमी मिळेल, अशी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Source link

manoj jarange newsmaratha protester crimesmaratha protester newsmaratha reservation newsमनोज जरांगे बातमीमराठा आंदोलक गुन्हेमराठा आंदोलक बातमीमराठा आंदोलन बातमीमराठा आरक्षण बातमी
Comments (0)
Add Comment