१. अभ्यासाची वेळ निश्चित करा आणि तुमचे Target सेट करा :
मोठा अभ्यासक्रम पाहून आणि त्यासाठी वेळ काढताना विद्यार्थी अनेकदा घाबरतात. अशा परिस्थितीत प्रत्येक विषयाचे वेळापत्रक (Study Schedule) बनवणे गरजेचे आहे. स्वत:साठी काही दैनंदिन लक्ष्य निश्चित करा आणि अभ्यासक्रम, तुमची आवड आणि तुमची तयारी यावर आधारित विषयांना प्राधान्य द्या.
२. मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या :
कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य मानसिक स्थितीबरोबरच निरोगी असणेही महत्त्वाचे असते. जर तुम्ही चांगली विश्रांती घेतली असेल, संतुलित आहार घेतला असेल आणि नियमित व्यायाम केला असेल तरच तुम्हाला उत्साही राहून तुम्ही अभ्यासवर लक्ष केंद्रित करू शकता. या सवयी तुम्हाला चांगल्या प्रकारे एकाग्र होण्यास आणि परीक्षेची तयारी करण्यास मदत करेल. शिवाय, आउटडोर एक्टिविटी (फिरणे, खेळणे) अशा गोष्टींसाठीही थोडासा वेळ द्या. याकाळात तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील लक्ष केंद्रित करा.
३. कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या :
तणावपूर्ण परिस्थितीत मित्र आणि कुटुंबीयांचा पाठिंबा असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मित्र आणि कुटुंब अशा वेळी मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करू शकतात आणि परीक्षेच्या तयारीमध्ये देखील मदत करू शकतात. तुमचे मित्र आणि कुटुंब आणि अगदी तुमच्या शिक्षकांकडून मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.
४. मॉक टेस्टवर भर द्या :
आगामी बोर्ड परीक्षांची तयारी करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, इतर नमुना पेपर आणि मॉक टेस्ट सोडवा. हे तुम्हाला परीक्षा पद्धती आणि मार्किंग स्कीम समजण्यास मदत करेल. ते सोडवताना तुम्हाला काही आव्हाने आली तर शिक्षकांची मदत घ्या.
५. तपशीलवार नोट्स बनवा :
प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तपशीलवार नोट्स बनवा. हे तुम्हाला अभ्यासक्रमात लवकर सुधारणा करण्यास मदत करेल. तसेच, अशा नोट्स तुम्हाला मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यास मदत करतील.