शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या ईडी चौकशीची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण?

हायलाइट्स:

  • आनंदराव अडसूळ यांच्यावरही ईडीची कारवाई होणार?
  • अमरावतीत गुरुवारी दिवसभर ईडीच्या कारवाईची चर्चा
  • अडसूळ यांनी ईडी चौकशीची चर्चा फेटाळली

अमरावती :शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावरही ईडीची कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमरावतीत गुरुवारी दिवसभर ईडीच्या कारवाईची चर्चा होती. मात्र सायंकाळी आनंदराव अडसूळ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून असं काहीही झालेलं नसल्याचं सांगत विरोधकांवर टीका केली आहे.

आनंदराव अडसूळ यांनी ईडी चौकशीबाबत होत असलेल्या चर्चेचं खापर आमदार रवी राणा यांच्यावर फोडलं आहे. ‘रवी राणा याला माहीत झालं आहे की कोर्टाचा निर्णय विरोधात आल्यामुळे त्याच्या पत्नीची खासदारकी जाणार आहे. तसंच स्वत: रवी राणा यांच्याविरोधातही एका प्रकरणात कोर्टात केस सुरू असून त्या प्रकरणाचा निकालही राणा यांच्याविरोधात जाणार आहे. या सगळ्यामुळे उद्विग्न झालेल्या रवी राणा याने माझी ईडी चौकशी होणार असल्याच्या बातम्या छापून आणल्या,’ असा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.

जयंत पाटील आक्रमक; भुजबळांबाबतच्या निकालानंतर भाजपला दिला इशारा

अडसूळ यांनी त्यांच्यावर झालेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांनाही उत्तर दिलं आहे. ‘ईडी आणि सहकार खात्याच्या चौकशीत माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे,’ असं म्हणत अडसूळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, आनंदराव अडसूळ यांनी ईडी चौकशीची चर्चा फेटाळली असली तरीही सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यात अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावलं जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Source link

Amravati newsAnandrao Adsulअमरावती न्यूजआनंदराव अडसूळईडी चौकशीशिवसेना
Comments (0)
Add Comment