Vivo Y100 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y100 5G मध्ये ६.६७-इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले आहे. जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १,२०० निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. Vivo Y100 5G मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित फनटच ओएस १४ वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये ५जी, वायफाय, ब्लूटूथ ५.० आणि एनएफसीची कनेक्टिव्हिटी मिळते. डिव्हाइसमध्ये युजर्सना इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्पिकर देखील मिळतात.
फोनमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी ब्रँडनं स्नॅपड्रॅगन ४ जेन २ चिपसेटचा वापर केला आहे. हा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो २.२गीगाहर्ट्झ पर्यंतच्या हाय क्लॉक स्पीडवर चालतो. स्टोरेजच्या बाबतीत डिवाइस ८जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६जीबी यूएफएस २.२ स्टोरेज मिळते. इतकेच नव्हे तर ही इनबिल्ट मेमरी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून आणखी वाढवता येईल.
स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे ज्यात ५०एमपीचा प्रायमरी सेन्सर, ८एमपीची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि फिल्कर सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ८०W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo Y100 5G ची किंमत
Vivo Y100 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शन लाँच करण्यात आले आहेत. डिवाइसच्या ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजची किंमत IDR ३,८९९,००० म्हणजे सुमारे २०,४०० रुपये आहे. मोबाइलचा ८ जीबी रॅम व २५६ जीबी मॉडेल IDR ४,१९९,००० सुमारे २२,००० रुपयांचा आहे. युजर्सना फोनसाठी Black onyx आणि Purple Orchid सारखे दोन ऑप्शन मिळतील.