रत्नागिरी : व्यायाम करण्यासाठी गेलेला तरुण घरी आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तात्काळ रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. शशिकांत सखाराम पेंढारी (वय ३१ रा. सयश अपार्टमेंट फेज ३ रुम नं. १, साळवीस्टॉप, हमालपंचायतच्या बाजूला) असं या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रत्नागिरी परिसरात शशिकांत उर्फ अमोल या नावाने हा तरुण परिचित होता.
२६ जानेवारी रोजी नऊ वाजेच्या सुमारास शशिकांत सखाराम पेंढारी हा तरुण व्यायाम करण्याकरता शांतीनगर येथील सरकारी व्यायाम शाळेत गेला होता. त्यानंतर तो दहा वाजता व्यायाम शाळेतून घरी आल्यावर त्याच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला तात्काळ खासगी वाहनाने उपचाराकरता सिव्हील हॉस्पीटल रत्नागिरी येथे दाखल केले. त्यानंतर त्याचेवर सिव्हील हॉस्पीटल रत्नागिरी येथे तातडीने आय.सी.यू. विभागात उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना काल २६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पीटल रत्नागिरी येथे त्याचा मृत्यू झाला.

शशिकांत सखाराम पेंढारी हा मूळचा संगमेश्वर बाजारपेठ येथील आहे. रत्नागिरी साळवी स्टॉप येथे त्याचा हॉटेल व्यवसाय आहे. शशिकांत पेंढारी याच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.