भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये ३६१ जागांवर भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Bharat Dynamics Limited Recruitment 2024 : Bharat Dynamics Limited ने भरतीची अधिसूचना जारी असून, या भारतीच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला श्रुवात झाली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड संरक्षण तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्याच्या मिशनमध्ये सामील होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. रक्षा प्रौद्योगिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना BDL भरती २०२४ द्वारे अनोखी संधी मिळणार आहे. BDL मधील या जागांवर चार वर्षासाठी नियुक्ती केली जाणार आहे.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज :

भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी २०२४ आहे.

रिक्त पदांचे तपशील :

या भरती मोहिमेचे उद्दिष्ट विविध युनिट्स आणि विभागांमधील एकूण ३६१ रिक्त पदे भरणे आहे. यामध्ये प्रकल्प अभियंता (Project Engineer), प्रकल्प अधिकारी (Project Officer), प्रकल्प पदविका सहाय्यक (Project Diploma Assistant), प्रकल्प व्यापार सहाय्यक (Project Trade Assistant), प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) आणि प्रकल्प कार्यालय सहाय्यक (Project Officer Assistant) या पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता :

बीडीएल भरती २०२४ साठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे BE / B.Tech / B.Sc अभियांत्रिकी / M.E. / M.Tech किंवा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातील समतुल्य शिक्षण झालेले असणे आवशयका आहे. यासोबतच कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा :

१४ फेब्रुवारी २०२४ रोजी उमेदवारांचे कमाल वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, उच्च वयोमर्यादेत नियमानुसार सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्काविषयी :

प्रकल्प अभियंता / प्रकल्प अधिकारी यांच्या अर्जाची फी ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

तर, प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट / प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / प्रोजेक्ट असिस्टंट / प्रोजेक्ट ऑफिस असिस्टंटसाठी २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

मिळणार एवढा पगार :

प्रकल्प अभियंत्याला पहिल्या वर्षी दरमहा ३०,०० रुपये पगार मिळेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला दरमहा ३३,००० रुपये, तिसऱ्या वर्षी ३६,००० रुपये तर, चौथ्या वर्षी ३९,००० रुपये पगार दिले जातील.

प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंटला पहिल्या वर्षी २५,००० रुपये, दुसऱ्या वर्षी २६,००० रुपये, तिसऱ्या वर्षी २८,००० रुपये आणि चौथ्या वर्षी २९,५००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

तर, प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंटला पहिल्या वर्षी २३,००० रुपये, दुसऱ्या वर्षी २४,५०० रुपये, तिसऱ्या वर्षी २६,००० रुपये आणि चौथ्या वर्षी २७,५०० रुपये मासिक वेतन दिले जाईल.

बीडीएल भरती २०२४ साठी निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीद्वारे केली जाईल. पात्रता आणि अनुभव असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

असा करा अर्ज :

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट bdl-india.in वर जा.
मुख्यपृष्ठावरील BDL भरती २०२४ लिंकवर क्लिक करा.
यानंतर सर्व आवश्यक तपशील द्या.
आता तुमचा अर्ज सबमिट करा.
आता सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

Source link

bdl recruitment 2024bharat dynamics limited 2024 jobsbharat dynamics limited bharti 2024bharat dynamics limited recruitment 2024bharat dynamics limited vacancyvacancy newsबीडीएलबीडीएल भरती २०२४
Comments (0)
Add Comment