तू आमच्या घरात शोभत नाहीस; चिमुकल्यासह विवाहितेसोबत सासरच्यांचे धक्कादायक कृत्य, गुन्हा दाखल

परभणी: वडिलांकडून दीड लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला या घरात ठेवणार नाही, असे म्हणून दोन वर्षाची मुलगी घरात ठेवून विवाहितेला आणि तिच्या सहा महिन्याच्या बाळाला घराबाहेर हाकलून दिल्याची घटना परभणीच्या पाथरी येथे घडली आहे. विवाहितेने पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेचे नाव प्रतिभा सुनील पाईकराव (२३) असे आहे.
हत्येतील आरोपीचा माय-लेकीवर अत्याचार, कुख्यात कुणाल गोस्वामी गजाआड; महाराष्ट्र हादरला
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा सुनील पाईकराव हिचा विवाह जून २०२० मध्ये सुनील पाईकराव यांच्याशी झाला. लग्नामध्ये वडिलांनी संसार उपयोगी साहित्य, सोने, कपडे एकूण अंदाजे चार लाख रुपये खर्च करून बौद्ध रीतीरीवाजाप्रमाणे थाटामाटात लग्न लावून दिले. लग्नानंतर प्रतिभा नाशिक येथे सासरी नांदण्यास गेली. लग्नानंतर दीड वर्ष सासरच्या लोकांनी तिला चांगले नांदवले. दरम्यान प्रतिभाला एक मुलगी श्रुती ही झाली. लग्नाचे अडीच वर्षे सुखात गेल्यानंतर नवरा सुनील पाईकराव, सासू सुंदराबाई पाईकराव, दीर अनिल पाईकराव आणि नणंद आम्रपाली शिंदे हे सर्वजण मिळून प्रतिभाला त्रास देऊ लागले.

तू दिसायला काळी आहेस. तुला स्वयंपाक येत नाही, तू आमच्या घरात सूट होत नाहीस, असे म्हणून शारीरिक मानसिक छळ करू लागले. नवरा सुनील रात्री दारू पिऊन येऊन शिवीगाळ करून मारहाण करू लागला. माहेरला जाऊन वडिलांकडून घराच्या डाग डीजे करण्याकरिता दीड लाख रुपये घेऊन ये, म्हणून तगादाही सुरू केला. प्रतिभाच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती आपल्या वडिलांना पैसे मागू शकली नाही. त्यामुळे सासरच्या मंडळींनी प्रतिभाला जास्तीत जास्त शारीरिक आणि मानसिक छळ देण्यास सुरुवात केली. तिला उपाशी पोटी देखील ठेवण्यात आले.

मागण्या मान्य, सरकारने पहाटे GR काढला; मनोज जरांगे विजयाचा गुलाल उधळणार

अशातच प्रतिमाला दुसरा मुलगा सारांश देखील झाला. मुलगा झाल्यामुळे आता त्रास कमी होईल, असे प्रतिभाला वाटत होते पण तसे घडलेच नाही. उलट त्रास वाढतच गेला. २४ जून २०२३ रोजी सासरच्या लोकांनी प्रतिमाला तुझ्या वडिलांकडून दीड लाख रुपये घेऊन ये. नाहीतर तुला या घरात ठेवणार नाही, असे म्हणत घराबाहेर काढले. प्रतिभाच्या मोठ्या मुलीला घरीच ठेवून घेत प्रतिभा आणि सहा महिन्याच्या मुलाला मात्र घराबाहेर हाकलून दिले. प्रतिभाने आपल्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. सहा महिन्याच्या बाळासह ती वडिलांसोबत माहेरी आली. माहेरी आल्यानंतर भरोसा सेल पाथरी येथे तडजोड करण्याकरिता अर्ज दिला. पण तडजोड न झाल्याने शेवटी पात्री पोलीस ठाण्यात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

in laws threw married womanparbhani crimeparbhani newsपरभणी बातमीसूनेला घराबाहेर काढले
Comments (0)
Add Comment