आईला वाचवताना मुलानेही गमावले प्राण; दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू

हायलाइट्स:

  • आईसह मुलाचाही बुडून मृत्यू
  • विहिरीतून पाणी काढत असताना घडली घटना
  • घटनेमुळे परिसरात हळहळ

जळगाव : आई विहिरीत पडल्याने तिला वाचवताना मुलाचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. नितीन पंढरीनाथ पाटील (वय २४) व प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय४५) अशी मृतांची नावे आहेत. पाचोरा तालुक्यातील अतुर्ली इथं ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे.

प्रतिभा पंढरीनाथ पाटील यांचे अंतुर्ली परिसरात शेत आहे. आज ९ सप्टेंबर रोजी त्या शेतात फवारणी करण्यासाठी मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील याच्यासह गेल्या. दरम्यान, फवारणी पंपासाठी लागणारे पाणी घेण्यासाठी प्रतिभा पाटील या दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीजवळ गेल्या. विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या.

मनोहर भोसले पुन्हा वादात; फसवणूक प्रकरणी बारामतीत गुन्हा दाखल

आई विहिरीत पडल्याचे पाहून मुलगा नितीन पाटील याने विहिरीकडे धाव घेतली. आईला वाचवण्यासाठी त्याने देखील विहिरीत उडी घेतली. दरम्यान विहिरीत गाळ असल्यामुळे आई व मुलगा या दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतातील शेतकरी व नागरिकांनी धाव घेतली. तब्बल दोन तासानंतर दोघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दोघांचे मृतदेह आणण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी नितीन पाटील यांच्या भावाचा देखील विहिरीत पडून मृत्यू झाला होता, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचं काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सूर्यकांत नाईक हे करत आहे.

Source link

jalgaon news in marathijalgaon news updatesजळगावजळगाव पोलीसबुडून मृत्यू
Comments (0)
Add Comment