‘७४ वर्षात जो देश उभा राहिला तो गेल्या ७ वर्षात विकला जातोय’

हायलाइट्स:

  • नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका
  • काँग्रेसला मत देण्याचे केलंआवाहन
  • ‘जनतेने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे’

साताराः ‘७४ वर्षात देश उभा राहिला तो देश ७ वर्षात विकला जात आहे. ब्रिटीश राजवटीसारखेच केंद्रातील सध्याचे सरकार जुलमी अन्यायी, अत्याचारी, सरकार असून त्याविरोधात पेटून उठले पाहिजे,’ अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर (Modi Government) जोरदार टीका केली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान, अभियान गुरूवारी सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले. त्यावेळी नाना पटोले यांनीही उपस्थिती लावली. यावेळी नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

वाचाःकाँग्रेसची अवस्था नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी: शरद पवार

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वांतत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला जगात ताठ मानेने उभे केले, विकासाच्या विविध योजना राबवून देशात क्रांती घडवून आणली त्या पंडित नेहरुंचा विसर केंद्रातील भारतीय जनता पक्षाला पडला आहे. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेताना पंडित नेहरुंचा फोटो टाकण्याचे सौजन्यही न दाखवता त्यांना वगळून देशाच्या स्वातंत्र्याप्राप्तीसाठी लढलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

वाचाः सत्य परेशान होता है, पराजित नही, दोषमुक्त झाल्यावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या ६० वर्षानिमित्त प्रदेश काँग्रेस लवकरच महाराष्ट्राच्या निर्मितीत काँग्रेस पक्षाचे योगदार हा कार्यक्रम घेऊन येणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या सरकारचे राज्याच्या जडणघडणीतील योगदान यातून जनतेसमोर आणले जाणार आहे. जनतेने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहनही पटोले यांनी केले.

वाचाः …तर महाविकास आघाडीला निवडणुकांत यश मिळणार; अजित पवारांचा फॉर्म्युला

Source link

central governmentCongress vs BJPNana Patolenana patole on bjpPM Modiनान पटोले
Comments (0)
Add Comment