४५वॉट फास्ट चार्जिंगसह येईल बाजारात
माय स्मार्टप्राइसच्या रिपोर्टनुसार, Nothing Phone 2a स्मार्टफोन TUV वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. लिस्टिंगनुसार, मोबाइल फोनचा मॉडेल नंबर A142 आहे. या हँडसेटमध्ये ४५वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाईल. तसेच, लिस्टिंग पेक्षा जास्त माहिती मिळाली नाही. तसेच, स्मार्टफोन ब्रँड नथिंगनं देखील आतापर्यंत नथिंग फोन २ए च्या लाँचिंग बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
लीक स्पेसिफिकेशन्स
याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, नथिंग फोन २ए अँड्रॉइड १४ आधारित ओएसवर चालेल. या फोनमध्ये ६.७ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ असेल. डिव्हाइसमध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेटसह १२जीबीपर्यंत रॅम आणि २५६जीबीपर्यंत स्टोरेज दिली जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी मोबाइल फोनमध्ये ५०एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, तर सेल्फीसाठी फ्रंटला १६एमपीचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ४,२९०एमएएचची बॅटरी मिळेल. या हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळू शकतात.
किती असू शकते किंमत
नथिंगनं आतापर्यंत नथिंग फोन २ए च्या किंमतीची कोणीतही माहिती दिली नाही. परंतु अलीकडेच समोर आलेल्या लीक्समध्ये दावा केला जात आहे की याची किंमत ३० ते ३५ हजार रुपयांदरम्यान ठेवली जाऊ शकते. हा फोन ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Nothing Phone 2 चे स्पेसिफिकेशन्स
स्मार्टफोन कंपनी नथिंगनं गेल्यावर्षी जुलैमध्ये नथिंग फोन २ लाँच केला होता. या डिवाइसची किंमत ३९,९९९ रुपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी एलटीपीओ अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. यात Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५०एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि ३२एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळतो. मोबाइल फोनमध्ये ४७००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.