बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या भरतीचा सर्व तपशील

BOB Recruitment 2024 : जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत आणि ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.बँक ऑफ बडोदाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये या भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिक्युरिटी मॅनेजर पदाच्या ३८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२४ आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

पदभरतीचा तपशील :

बँक : बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद : सुरक्षा अधिकारी (Security Manager)
पद संख्या : ३८ जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ८ फेब्रुवारी २०२४

श्रेणीनुसार भरतीचा तपशील :

1. SC श्रेणी : ५ जागा
2. ST श्रेणी : २ जागा
3. OBC प्रवर्ग : १० जागा
4. EWS श्रेणी : ३ जागा
5. UR श्रेणी : १८ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :

बँक ऑफ बडोदामधील या जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.
याशिवाय, उमेदवारास आर्मी/नेव्ही/एअर फोर्समधील कमिशन्ड सेवेचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवशयक आहे.
वयोमर्यादा :

बँक ऑफ बडोदामधील सिक्युरिटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे वय २५ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. एससी / एसटी वर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची तर, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्काविषयी :

या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ६०० रुपये तर, SC, ST आणि महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

अशी होणार निवड :
1. ऑनलाइन चाचणी
2. सायकोमेट्रिक चाचणी किंवा गट चर्चा
3. मुलाखत

मिळणार एवढा पगार :

या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या आणि निवड होऊन नोकरीवर रुजू ह्ंनर्‍य उमेदवारला प्रतिमाह ४९,९१० रुपये ते ६९,८१० रुपये पगार दिला जाईल

काही महत्वाच्या लिंक्स :

बँक ऑफ बडोदामधील पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदामधील पदभरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा.

बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लॉक करा.

Source link

bank of barodabank of baroda jobBank Of Baroda Recruitment 2024Bank Recruitmentbob job 2024bob recruitmentBOB Recruitment 2024bob security manager jobsबँक ऑफ बडोदाबॅंक ऑफ बडोदा
Comments (0)
Add Comment