पोलिसांच्या अरेरावीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ‘पत्रकार हे त्यांचं काम करत असतात. शिवाय लालबागमध्ये गेलेल्या पत्रकारांकडं अधिकृत पास होते. सर्व नियमांचं पालन करून ते काम करत होते. असं असतानाही त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली हे निषेधार्हच आहे. तो व्हिडिओ मी स्वत: पाहिला. ‘हात काय, पायही तोडू’ असे डायलॉग काही पोलीस अधिकारी मारताना त्यात दिसत आहेत. हे वर्तन अत्यंत चुकीचं आहे. खरंतर तिथं गर्दी झाली होती अशातलाही काही भाग नाही. त्यामुळं इतकी दंडुकेशाही योग्य नाही. ह्या दंडुकेशाहीच्या जोरावर कुणी कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असेल तर बरं नाही,’ असं फडणवीस म्हणाले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे, पण त्या आधी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.
Mumbai : हात काय मी पाय पण लावील; मुंबई पोलीस अधिकाऱ्याची पत्रकाराला धक्काबुक्की
वाचा: पवारांची काँग्रेसवरील टीका खटकली; नाना पटोलेंनी दिलं जोरदार प्रत्युत्तर
फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला. ‘गेल्या दोन वर्षांमध्ये माध्यमांवर दबाव तयार करण्याचा प्रयत्न होतोय. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी अटक करायची तर कधी आणखी काही कारवाई करायची. एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा: करोनाविरुद्ध आंदोलनाचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन; गणरायालाही घातले साकडे