दहा कोटींचा रेडा, अडीच फूटांची गाय अन् १०० किलोचा बोकड, कोल्हापूरकरांची भीमा कृषी प्रदर्शनात गर्दी

कोल्हापूर: उंच आणि धिप्पाड दहा कोटींचा गोलू रेडा, अडीच फूट उंचीची सर्वात लहान पुंगनूर गाय, तब्बल ३५ लिटर दूध देणारी म्हैस, झुंजीचा कोंबडा , १०० किलो वजन असलेला वैताळ बोकड आणि असे बरेच काही प्राणी पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गेल्या तीन दिवसांपासून मेरी वेदर मैदानावर भरवण्यात आलेल्या भीमा कृषी- पशू प्रदर्शनास गर्दी केली आहे.

खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून गेली १५ वर्षापासून कोल्हापुरात भीमा कृषी पशुप्रदर्शनाचा आयोजन करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील २६ ते २९ जानेवारी दरम्यान या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनातील शंभर किलो वजनाचा वैताळ बोकड, फायटर कोंबडा, ९५ किलो वजनाचा १ वर्ष २६ दिवसांचा कोहिनूर बिटल बकरा, लाल कंधारी म्हैस, रावण नावाचा ६ फूट २ इंच लाल कंधारी वळू, नांदेड येथील खिल्लार बैल, साडेचार फूट लांब शिंगे असलेले पंढरपुरी म्हैस प्रमुख आकर्षण ठरत आहेत. याशिवाय कडकनाथ कोंबड्या, लव्ह बर्ड, ससे हेही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत तर या सर्वात हरियाणा वरून आणलेला तब्बल १० कोटी रूपयांचा गोलू २ या रेड्याची चर्चा सध्या सर्वाधिक सुरू असून नागरिक या या रेड्याला पाहायला मोठी गर्दी करत आहेत. हत्ती नंतर सर्वात मोठा आणि लांब प्राणी गोलू २ असल्याचा दावा या रेड्याच्या मालकाने केला आहे.

उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा

या गोलू रेड्याने आतापर्यंत अनेक बक्षीस जिंकले असून याला सांभाळणे देखील वाटतं तेवढे सोपे नाहीये. गोलूला रोज १५ ते २० किलो पशु आहार, ५ किलो फळ आणि रोज २० लिटर दूध लागतं तसेच त्याच्यासाठी स्वतंत्र आंघोळीची व्यवस्था आणि २४ तास एसी आणि टीव्हीची देखील सोय करण्यात आली असून तो रोज टीव्ही देखील पाहतो

गोलू 2 रेड्याचे मालक: नरेंद्र सिंघ

तर अशा या आगळ्यावेगळ्या रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात असलेली सर्वात कमी उंचीची पुंगनूर गाय देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. ही गाय तीन वर्षाची असून केवळ २ फूट ५ इंच यांची उंची आहे. ही गाय दिवसाला चार ते पाच लिटर दूध देत असून तब्बल ५०० रुपये लिटर या दुधाची विक्री होते असे गायीच्या मालकाकडून सांगण्यात येत आहे.

अजित पवार गंगावेस तालमीत; अधिकाऱ्यांना फोन करुन बोलावून सूचना दिल्या

Source link

bhima agricultural exibitiongolu bullKolhapur newspungnur cowकोल्हापूर न्यूजगोलू रेडापुंगनूर गायभीमा कृषी प्रदर्शन
Comments (0)
Add Comment