Realme 12 Pro+ 5G मध्ये 120X Zoom
प्रो प्लस मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत ६४ मेगापिक्सलची पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. हा कॅमेरा OIS टेक्नॉलॉजीसह 120X Zoom ला सपोर्ट करतो. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे.
हे देखील वाचा:
Realme 12 Pro+ 5G चे इतर स्पेसिफिकेशन्स
रियलमी १२ प्रो प्लस ५जी फोनमध्ये ६.७ इंचाची फुलएचडी+ ओएलईडी कर्व्ह एज डिस्प्ले देण्यात आला आहे. जो २४१२ x १०८० पिक्सल रिजोल्यूशन , १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, २४०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, २१६०पीडब्ल्यूएम डिमिंग, ९५०निट्स ब्राइटनेस आणि १.० बिलियन कलरला सपोर्ट करतो.
रियलमी १२ प्रो+ ५जी फोन अँड्रॉइड १४ आधारित रियलमी युआय ५.० वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७एस जेन २ ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो ७१० जीपीयू आहे. सोबत १२जीबी पर्यंत रॅम व २५६जीबी पर्यंत स्टोरेज आहे. १२जीबी डायनॅमिक रॅमच्या मदतीनं एकूण २४जीबी रॅमची ताकद मिळवता येते.
रियलमीचा हा स्मार्टफोन ५,०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी मोबाइलमध्ये ६७वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ज्यामुळे फक्त १९ मिनिटांत ही बॅटरी ० ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होते, तसेच ४८ मिनिटांत १००% चार्ज होते.
Realme 12 Pro+ 5G ची किंमत
Realme 12 Pro+ चे तीन मॉडेल बाजारात आले आहेत. फोनचा ८जीबी रॅम व १२८जीबी मॉडेल २९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर १२जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज ३१,९९९ रुपये आणि १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल ३३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा रियलमी फोन येत्या ६ फेब्रुवारीपासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल आणि Submariner Blue, Navigator Beige आणि Explorer Red कलरमध्ये विकत घेता येईल.