उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांची एकच तारांबळ

कोल्हापूर: गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आणि गावच्या स्थानिक राजकारणातून घर जमीन दोस्त केल्याचा आरोप करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदार संघातील एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. एका बाजूला जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांची बैठक सुरू असताना दुसऱ्या बाजूला कार्यालयाबाहेर अचानक हे कुटुंब आत्मदहनाचा प्रयत्न करत असलेला पाहून पोलिसांची एकच तारांबळ उडाली. यावेळी कुटुंबातील एकाने हातात तेलाचा डब्बा घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तेलाचा डब्बा हातातून काढून घेत सर्वांना ताब्यात घेतले यावेळी कुटुंबाचा आक्रोश आणि दोन लहान मुलांची रडतानाचे चित्र हे अत्यंत क्लेशदायी होते.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असून सकाळी १० ते १२ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत होते. याचवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदार संघ असलेल्या कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील सागर पुजारी यांनी आई, पत्नी आणि दोन लहान मुलांसह हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि तेलाचा डबा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात आले आणि अचानक घोषणाबाजी करत आत्मदहनाचा प्रयत्न करू लागले. याचवेळी मागून त्याची पत्नी व आई आपल्या दोन्ही मुलांसह आक्रोश करत रडू लागले अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. पोलिसांनी त्वरित सागर पुजारी याच्या हातातील खेळाचा डबा काढून घेतो त्याला बाजूला घेऊन गेले मात्र वृध्द आई आणि पत्नी आपल्या मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटायची मागणी करू लागले.

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, सागर पुजारी यांचे कसबा सांगाव येथे घर होते. मात्र ते घर आठ महिन्यापूर्वी गावच्या स्थानिक राजकारणातून अतिक्रमणात असल्याचं सांगून पाडण्यात आले. केलेली करवाई चुकीची असल्याचा आरोप करत पुजारी यांनी केला तर घर पाडल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. त्याठिकाणी अन्य अतिक्रमणाला हात न लावता केवळ आमचेच घर पाडण्यात आले असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

तसेच पोलिस येथील गाव गुंडांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटायची वेळ मागत आहे, मात्र ते मिळत नसल्याने आम्ही आज आत्मदहन करत आहोत, असे सागर पुजारी यांनी म्हटले. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुजारी कुटुंबियांनी करत असून तहसीलदार शिल्पा ठोकरे यांच्यावर ही ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे.

Source link

Deputy chief minister Ajit Pawarfamily attempted self-immolation in kolhapurkolhapur collectors officeKolhapur News Todayकोल्हापूर न्यूज
Comments (0)
Add Comment