ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशींचं शुक्लकाष्ट, मातोश्रीचे निकटवर्तीय बडे नेते अडचणीत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणाकडून चौकशी सुरू आहे. त्यातच आता आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, एसआरए घोटाळा, गोरेगाव पत्राचाळ प्रकरण, रवींद्र वायकर यांचा हॉटेल घोटाळा यावरून किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. त्या प्रकरणी ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांनी चौकशी सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या अनिल देसाई यांच्या स्वीय सहाय्यकाचे नाव समाविष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ सुरू असल्याचे समोर आले आहे.
नारायण राणेंना भेटून सांगतो, जरा तुमच्या पोराला आवरा; नरसय्या आडम भडकले
ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दिनेश बोभाटे यांनी आपल्या मिळकतीपेक्षा ३६ टक्के बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये दिनेश बोभाटे असिस्टंट आणि सीनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते. २०१४ ते २०२३ या काळात बोभाटे यांनी आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोभाटे यांनी बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा सीबीआयने आरोप केला आहे. याप्रकरणी सीबीआयने दिनेश बोभाटे यांच्यावर गुन्हा दखल केला आहे.

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथील महापालिकेचा भूखंड अवैधरित्या ताब्यात घेऊन तेथे हॉटेल आणि मातोश्री क्लब बांधल्याचा आरोप करत हा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याप्रकरणी ईडीकडून रवींद्र वायकर यांची चौकशी सुरू आहे. गेल्या महिनाभरात रवींद्र वायकर यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावले होते. त्यानंतर अखेर रवींद्र वायकर हे चौकशीला हजार झाले आहेत.

कायदा बनलाय, जवळपास आरक्षण मिळालंय, मराठे जिंकून आलेत : मनोज जरांगे पाटील

वरळीतील एसआरएचे गाळे लाटल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला होता. तसेच किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला कोविड काळात कंत्राट देऊन घोटाळा केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्याबरोबरच कोविड काळात बॉडी बॅग घोटाळा केल्याची टीका किरीट सोमैया यांनी केली होती. यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांनाही कथित खिचडी घोटाळा प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. त्यात आता अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्यावरही सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने ठाकरे गटातील नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागल्याचे दिसून येत आहे.

Source link

anil desai newsdinesh bobate bookeddinesh bobate booked by cbidinesh bobate newsmaharashtra politics newsअनिल देसाई बातमीठाकरे गट बातमीदिनेश बोभाटे बातमीदिनेश बोभाटे सीबीआय चौकशीमहाराष्ट्र राजकारण
Comments (0)
Add Comment