ठाणे: शहरातील रामचंद्रनगरमध्ये पाइपलाइन रस्त्यावर तानाजी शिंदे या २८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्य़ात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिजामातानगर परिसरात वास्तव्यास असलेला तानाजी काहीच काम करत नाही. रविवारी रात्री ८.३० वाजता पाचपाखाडी येथे जाऊन येतो, असे सांगून तानाजी घरातून निघून गेला. मात्र, सोमवारी सकाळी पाइपलाइन रस्त्यालगत त्याचा मृतदेह आढळला. सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. डोक्यात लाकडी फळी मारुन तानाजी याची हत्या करण्यात आली असून तीन आरोपी आहेत.

आरोपी त्याचे मित्र असून शिविगाळीवरुन हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून दोघांचा शोध चालू असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. हत्येचा हा प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या पूर्वी घडला आहे. तानाजीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे.