सिद्धीविनायक दर्शन होणार सुलभ, सुविधा वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेचा विशेष प्रकल्प

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात भाविकांना वाढीव सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका विशेष प्रकल्प राबविणार आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असून, पूजा साहित्य विक्रेत्यांचे गाडगीळ मार्गावर स्थलांतर प्रस्तावित आहे. दादर रेल्वे स्थानक पश्चिम ते सिद्धिविनायक मंदिरादरम्यान दर ५ मिनिटांना ‘बेस्ट’तर्फे मिनी बस सुरू करण्यात येणार आहे.

पालिकेच्या दादर जी उत्तर व वरळी जी दक्षिण विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात मुंबईसह देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना अधिकाधिक सुलभरित्या दर्शन व्हावे, यासाठी पालिकेने विशेष प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष व आमदार सदा सरवणकर, पालिकेच्या वतीने उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात भाविकांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्ता, रस्ते रुंदीकरण, मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार, अत्याधुनिक स्वच्छतागृह आदी सुविधांचा समोवश असेल.

खडकवासला ६१ टक्क्यांवर; तर उजनी शून्यावर, जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचं आव्हान जलसंपदा विभाग कसं पेलणार?

मंदिरात येणाऱ्या भाविकांना उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेमार्फत ‘स्वारस्याची अभिव्यक्ती’ मागवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार/वास्तुशास्त्रज्ञ यांची निवड करण्यात येणार आहे. प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार / वास्तुशास्त्रज्ञ यांनी दिलेल्या अहवालावर सदा सरवणकर आणि रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली जी उत्तर आणि जी दक्षिण या दोन्ही विभागांचे सहायक आयुक्त, पालिका वास्तुविशारद त्याचप्रमाणे प्रमुख अभियंता (विकास नियोजन), प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक), नगर उप अभियंता (इमारत बांधकाम शहर) या विभागांचे अधिकारी या प्रकल्पाचे कामकाज पाहणार आहेत.

– मंदिराभोवती (रावबहादूर सी. के. बोले मार्गावर) असलेल्या पूजा साहित्य विक्रेत्यांमुळे प्रवेशद्वाराजवळ दररोज गर्दी होते. ती टाळण्यासाठी पूजा साहित्य विक्रेत्यांचे काकासाहेब गाडगीळ मार्गावर स्थलांतर करण्याचे प्रस्तावित

– दादर स्थानक ते मंदिरादरम्यान दर ५ मिनिटांना ‘बेस्ट’ची बस

– मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहे.

– मंदिराच्या दोन्ही मार्गांवर भव्य प्रवेशद्वार उभारणार

– अत्याधुनिक स्वच्छतागृह तयार करणार

– दिव्यांग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शन रांगेत तात्पुरती बसण्याची व्यवस्था

– ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे याकरिता छत

– मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण

– भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था

– मंदिराच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना

– मंदिराजवळील नवीन मेट्रो स्थानकापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वाढीव सुविधा

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी सदा सरवणकर; ढोल ताशांच्या गजरात शिंदे गटाचा जल्लोष

Source link

BMCMumbai Municipal Corporationmumbai newssiddhi vinayak temple mumbaiमुंबई न्यूजमुंबई महानगरपालिकासिद्धीविनायक मंदिर मुंबई
Comments (0)
Add Comment