एअरबॅग टेक्नॉलॉजी म्हणजे काय
कंपनीनं लाँच डेट कन्फर्म करण्यासाठी जो पोस्टर शेयर केला आहे, त्यात RIP Tempered Glass लिहलं आहे. हा भारतातील पहिला अल्ट्रा बाउंस डिस्प्ले असलेला फोन आहे, जो ‘एअरबॅग’ टेक्नॉलॉजीसह येईल. जिचा अर्थ असा की हा फोन अश्याप्रकारे डिजाइन करण्यात आला आहे, जेणेकरून दैनंदिन वापरात आणि अपघाती ड्रॉप्स हा फोन सहज सहन करू शकेल. फोनला स्वित्झर्लंडच्या SGS कडून ऑल-अँगल ड्रॉप रेजिस्टन्स सर्टिफिकेट देखील मिळाला आहे.
हे देखील वाचा:
HONOR X9b चे फीचर आणि स्पेसिफिकेशन
HONOR X9b मध्ये ६.७८ इंचाचा कर्व OLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १.५के रिजॉल्यूशनला सपोर्ट करतो.परफॉरमेंससाठी स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिपसेटचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रिनो ७१० जीपीयू आहे. डिव्हाइसमध्ये १२जीबी पर्यंत रॅम आणि २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
HONOR X9b मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आला आहे. ज्यात १०८ एमपीचा मुख्य, ८ एमपीचा अल्ट्रा वाइड आणि २ एमपीचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच फ्रंटला १६ एमपीचा कॅमेरा मिळतो. HONOR X9b ५,८०० एमएएच बॅटरी आणि ३५वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम ५जी, ४जी, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.१ जीपीएस, सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक फीचर्स मिळतात. HONOR X9b अँड्रॉइड १३ आधारित मॅजिक युआय ७.२ वर चालतो.