काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांसह १२ जणांवर गुन्हा दाखल

हायलाइट्स:

  • कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळली
  • नियम मोडणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दणका
  • जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या १२ प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल

सोलापूर : शहरात गुरुवार ९ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळली होती. या कार्यक्रमात करोना प्रतिबंधक सर्व नियम तोडून गर्दी केल्याप्रकरणी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या १२ प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यांनी जमावबंदीचे आदेश शहरात लागू केले आहेत. असं असतानाही धवलसिंह मोहिते पाटील आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमादरम्यान मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे अशा सूचनांकडे दुर्लक्ष केलं.

राज्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त; जाणून घ्या ताजी आकडेवारी

मोहिते पाटील यांच्यासह आणखी कोणाविरुद्ध दाखल झाला गुन्हा?

जेलरोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी गुलाबबाबा पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १) अर्जुनराव पाटील २) प्रकाश वाले ३) संजय हेमगडडी ४) अमोल पुजारी ५) सुरेश हसापुरे ६) अशोक देवकते ७) गणेश डोंगरे ८) बाबा करगुळे ९) विनोद भोसले १०) बसवराज बगले ११) श्रीमती हेमा चिंचोळकर १२) धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४३, १८८, २६९, ३३६ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (बी) सह भारतीय साथरोग अधिनियम १८९७ चे कलम ३ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्तेत सामील असणाऱ्या काँग्रेसच्या बड्या पदाधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Source link

coronavirussolapur news todayकरोना निर्बंधधवलसिंह मोहिते पाटीलसोलापूर
Comments (0)
Add Comment