Fighter चे बॉक्स ऑफिसवरील विमान वीकेंड संपताच ढासळले, ७२ टक्क्यांनी घटली सिनेमाची कमाई

मुंबई– हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या ‘फाइटर’ या सिनेमाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर चांगला जम बसवायला सुरुवात केलेली. पण रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी सिनेमाची हालत खराब झाली आहे. या एरियल-ॲक्शन चित्रपटाने चार दिवसांच्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी केली होती.

पहिल्या वीकेंडमध्ये सिनेमाने ११८.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पण रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी चित्रपटाची कमाई पहिल्या दिवसाच्या तुलनेत -६४% आणि रविवारच्या तुलनेत -७२% पेक्षा जास्त कमी झाली आहे. ही चिंतेची बाब आहे, कारण सध्या चित्रपटगृहांमध्ये तेजा सज्जाच्या ‘हनुमान’ सोबत ‘फायटर’ शिवाय कमाई करणारा दुसरा चित्रपट नाही.

आधी बहिणीसोबत व्यंकटेश्वर मंदिरात पूजा मग अभिनेत्री दीपिका पदुकोण पोहोचली तिरुपतीला

सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘फायटर’मध्ये ॲक्शनपासून इमोशन आणि देशप्रेमापर्यंत भरपूर मसाला आहे. पहिल्या दिवशी २२.५० कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन करणाऱ्या या चित्रपटाला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा मोठा फायदा झाला आणि चित्रपटाची कमाई ३९.५० कोटींवर पोहोचली आहे.

मात्र यानंतर शनिवार आणि रविवारी वीकेंड असूनही ‘फायटर’ फारसे यश मिळवता आले नाही. २६ जानेवारीप्रमाणेच रविवारी चौथ्या दिवशीही चित्रपटाची कमाई होईल, अशी अपेक्षा होती, पण २९ कोटींवरच समाधान मानावे लागले. आता रविवारी ७२% कमी झाल्यामुळे मेकर्सची चिंता वाढली आहे.

इमोशनल ब्लॅकमेल करण्यात पटाईत होते रमेश देव,लाडक्या बायकोला भेटवस्तू देण्याचे शोधायचे बहाणे
‘फायटर’ ची सोमवारी १० कोटींचीही कमाई नाही

sacnilk च्या अहवालानुसार, ‘फाइटर’ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे सोमवारी केवळ ८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाच दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता १२६.५० कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाची प्रेक्षक संख्या १२ % पर्यंत खाली आली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’शिवाय बॉलिवूडचा कोणताही मोठा चित्रपट नाही. साऊथच्या ‘हनुमान’ने करोडोंची कमाई केली शिवाय १८ व्या दिवशी या चित्रपटाने हिंदीतही लाखोंचा आकडा गाठला आहे.

CID ला २६ वर्षे पूर्ण, पण फ्रेडीशिवाय अधुरीच दिसतेय टीम, चाहत्यांची सीझन २ ची मागणी
‘फायटर’चा जगभरातील कलेक्शन

‘फाइटर’ने चार दिवसांत जगभरात २०३.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर आता पाचव्या दिवशी देशा-विदेशात मिळून जवळपास १२ कोटींची कमाई करणार आहे. अशाप्रकारे, ५ दिवसांत चित्रपटाचे एकूण जगभरातील कलेक्शन आता २१५ कोटींच्या जवळपास आहे.

इंडस्ट्रीला मोठ्या हिटची गरज

बॉलिवूडला सध्या मोठ्या हिटची गरज आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि सलमान खानचा ‘टायगर ३’ यांनी कलेक्शनमध्ये एकूणच चांगली कमाई केली, पण या सिनेमांना यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

Source link

box office collectionDeepika Padukonefighter box officehrithik roshan moviehrithik roshan moviesफायटर बॉक्स ऑफिसफायटर मुव्हीबॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment