करोनाविरुद्ध आंदोलनाचं मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन; गणरायालाही घातले साकडे

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन
  • मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली गणरायाची प्रतिष्ठापना
  • अमंगल ते सर्व नष्ट होवो, मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

मुंबई: ‘जे जे अमंगल आहे, ते नष्ट होवो’, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गणरायाच्या चरणी केली. ‘करोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत’, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच, करोनामुक्तीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही केलं. ‘केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून करोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे.’

वाचा: करोनासोबतच काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोग दूर कर; छगन भुजबळांचे बाप्पाला साकडे

गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते, आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनी देखील करोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून करोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरू करूया, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

वाचा: काँग्रेसवरील पवारांच्या टीकेला पटोलेंचं जोरदार उत्तर; म्हणाले, ‘त्या’ लोकांनीच डाका घातला!

Source link

Ganesh Chaturthi 2021Ganeshotsav at Varsha BungalowUddhav ThackerayVarsha Bungalow Ganeshotsavउद्धव ठाकरेगणेश चतुर्थी
Comments (0)
Add Comment