‘माफ करा, कोणालाही दोषी धरु नये’, फरशीवर खडूने लिहून आयुष्याची दोर कापली; चिठ्ठीत लिहिलं…

पुणे : ”माफ करा, कोणालाही दोषी धरु नये”, असं फरशीवर लिहून एका ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आज मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जुनी तांबे वस्ती परिसरात हि घटना उघडकीस आली आहे.

दिगंबर गोविंद गोसावी (वय ५५ रा. जुनी तांबे वस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी आकाश दिगंबर गोसावी (वय ३०) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चंदीगडमध्ये भाजपचाच महापौर, इंडिया आघाडीला धक्का, विनोद तावडेंकडून सलग दुसरी मोहीम फत्ते, आप काँग्रेस आक्रमक
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर गोसावी यांना दारू पिण्याचे व्यसन होते. तसेच ते सतत आजारी असल्यामुळे त्यांना अशक्तपणा असायचा. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आकाश गोसावी यांना खोलीतील फरशीवर खडूने “गौरी मुंगेरीलाल” व “आकाश मला माफ कर” असे लिहिलेलं दिसलं. तसेच तिथेच शेजारी “कोणालाही दोषी धरू नये” असे लिहून त्याखाली सही केलेली चिठ्ठी सापडली.

तसेच घरातील लोखंडी अॅंगलला दोरीच्या सहाय्याने दिगंबर गोसावी यांनी गळफास घेतलेला आढळून आला. शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याने आकाश गोसावी यांनी तात्काळ उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व गोसावी यांना उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान, यावेळी डॉक्टरांनी तपसणी करून उपचारापूर्वीच गोसावी हे मयत झाल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करत आहेत.

बिहारमध्ये लालूंनी २७ वर्षांपूर्वी जे केलं त्याची झारखंडमध्ये पुनरावृत्ती? कल्पना सोरेन मुख्यमंत्री होणार का?

Source link

Pune crime newspune local crime newsPune Policeuruli kanchan suicideउरुळी कांचन आत्महत्यापुणे क्राइम बातम्यापुणे पोलीसपुणे लोकल क्राइम बातम्या
Comments (0)
Add Comment