‘ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला एकटं पाडत असतील तर..’ भुजबळांच्या पाठिंब्यासाठी ओबीसी एकवटणार!

मुंबई : महाराष्ट्र सरकारमध्ये किती ओबीसी मंत्री आहेत, हे पाहावं लागेल.जे आहेत, ते सत्तेसाठी शेपूट घालून बसले आहेत. परंतु छगन भुजबळ ओबीसी बांधवांच्या हक्कांसाठी भांडत आहेत. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं जाहीर करताना आमच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असे विधान राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यातील विविध ओबीसी संघटनांबरोबर मुंबईत विजय वडेट्टीवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल पत्रकारांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले, “छगन भुजबळ ओबीसी हिताची भूमिका मांडत आहेत. त्यांच्या भूमिकांना आमचा पाठिंबा आहे. इतर नेते सत्तेसाठी शेपूट घालून बसलेले असताना भुजबळ ओबीसी हक्कांसाठी भांडतायेत. त्यामुळे बहुजनांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. २० तारखेला संभाजीनगरमध्ये होणाऱ्या विराट सभेला आम्ही भुजबळ यांना निमंत्रित केलंय”.

शक्तीस्थळांवर जाऊन आशीर्वाद घेऊ, २० तारखेला विराट सभा, भुजबळांना निमंत्रण

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कामात बारा बलुतेदार-अठरा पगड जातींनी समावेश होता. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत त्याच बहुजनांच्या शक्तीस्थळांवर आम्ही सगळे ओबीसी नेते जाणार आहोत. तिथे शक्तीस्थळांचा आशीर्वाद घेऊन बहुजनांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा निर्धार आम्ही करणार आहोत. त्यानंतर २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची विराट सभा होणार आहेत. कुणाला दिलंय म्हणून नाही तर आमच्या हक्कांसाठी सभा घेऊ. ओबीसींच्या हितासाठी बोलणाऱ्या नेत्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यातील तमाम ओबीसी बांधव येतील, असं वडेट्टीवार म्हणाले.

सरकारमध्ये भुजबळ एकटे पडलेत का? वडेट्टीवार म्हणाले…

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याची ओबीसी बांधवांची भावना आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही तीच भावना बोलून दाखवली आहे. मात्र यावरून सरकारमध्ये भुजबळ एकटे पडल्याची चर्चा आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर वडेट्टीवार म्हणाले, समाजासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्याला जर एकटं पाडत असतील तर समाज लढणाऱ्या नेत्याला पाठिशी उभा राहिल”

Source link

chhagan bhujbalOBC reservationVijay Wadettiwarvijay Wadettiwar OBC organizations meetingvijay wadettiwar on chhagan bhujbalओबीसी आरक्षणछगन भुजबळछगन भुजबळ विजय वडेट्टीवारविजय वडेट्टीवार
Comments (0)
Add Comment