महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला; कलाशिक्षकाचे धक्कादायक कृत्य, नागरिकांकडून आरोपीला चोप

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात सुरू असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवात महिलांच्या बाथरूममधून आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मंगेश विनायक खापरे (३७) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा शहरातील एका खासगी शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे महोत्सवाच्या आयोजकांनी मुख्य गेट सजवण्यासाठी आरोपीला बोलावले होते.
बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली; मुख्याध्यापकांसह कार्यालय अधिक्षकांना एसीबीनं रंगेहात पकडलं
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रांगणात २७ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून आणि परदेशातूनही उद्योजक आले होते. प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या महिलांच्या बाथरूममध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवताना एका तरुणाला रंगेहात पकडण्यात आले आहे. पीडित महिला ३२ वर्षांची असून ती खासदार औद्योगिक महोत्सवात स्वयंसेविका म्हणून काम करत होती. महिलांच्या स्वच्छतागृहात महिलेने आरोपी मंगेशला मोबाईलमधून लपून व्हिडिओ काढताना पाहिले.

पावसाअभावी मोसंबी बागेचे नुकसान; शेतकऱ्यानं जिद्दीनं पेरुची लागवड केली अन् लाखो रुपये कमावले

त्यानंतर आरोपीला पकडण्याचा प्रयत्न महिलेने केला. मात्र आरोपी तिथून निसटला. महिलेने या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांसह आपल्या सहकाऱ्यांना दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता मंगेश बाथरूमजवळून पळताना दिसला. परिसरात त्याचा शोध घेतल्यानंतर आरोपी सापडून आला. त्याला पकडताच संतप्त लोकांनी त्याला जागीच बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती अंबाझरी पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या मोबाईलमधून आतापर्यंत सुमारे १९ अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने मोबाईलमधून काही व्हिडिओ डिलीट केले आहेत, त्याचाही तपास सुरू केला आहे.

Source link

art teacher arrestedart teacher arrested for offensive videoNagpur newsआक्षेपार्ह व्हिडिओ बातमीकला शिक्षक आक्षेपार्ह व्हिडिओकलाशिक्षक अटकनागपूर बातमी
Comments (0)
Add Comment