दोन लाख दे, पाच नंबरचा आरोपी दाखवतो नाहीतर… लाच घेताना पोलीस अधिकारी ACBच्या जाळ्यात

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पोलिस ठाण्यातच सापळा लावून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दोन लाखांची लाच घेताना एका पोलिस अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. शरद पवार असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. पवार भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती एसीबीने दिली.

तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून दोषारोपही तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये मदत करण्यासह मुलाला पाच नंबरचा आरोपी दाखवण्यासाठी या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक शरद पवार (३७) यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांच्या लाचेची मागणी करत दोन लाख स्विकारण्याचे मान्य केले. या लाचेबाबत तक्रार आल्यानंतर एसीबीने पडताळणी केली.

Maratha Reservation Survey: मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत होणार सर्वेक्षण
पवार यांनी तक्रारदार यांना पैसे घेऊन नारपोली पोलिस ठाण्यात बोलवले होते. एसीबीने कुणालाही कुणकुण न लागता पोलिस ठाण्यातच सापळा लावत दोन लाखांची लाच घेताना पवार यांना रंगेहात पकडले. याबाबत पुढील कारवाई चालू असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई एसीबीच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर, सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माधवी राजेकुंभार यांच्या पथकाने केली.

वडिलांना करोनात गमावले, अंगणवाडी सेविका आईने वाढवले, महाराष्ट्राच्या लेकीने पदक जिंकत नाव उंचावले…

Source link

police officer arrested for taking bribeThane crime newsthane policethane police officer in acb netठाणे क्राइम बातम्याठाणे पोलीसठाणे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यातपोलीस अधिकारी लाच घेताना अटक
Comments (0)
Add Comment