रायगड: मराठा समाजातील सगेसोयऱ्यांची काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, तसेच त्यांचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये कायदा पारित करावा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे सकल मराठा समाजाचे मनोज जरांगे यांनी किल्ले रायगड येथे सांगितले. जरांगे यांनी आज किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारमध्ये एक वाक्यता नाही असे सांगून ते म्हणाले की, आम्ही आता गाफील नाही. सरकारने वेळोवेळी वेळ वाढवून मागितला आहे. कायद्याची अंमलबजावणी वेळेत होणे गरजेचे आहे. समितीला मुदतवाढ दिलेली असतानाही समिती कामे करीत नाही, असा आरोप जरांगे यांनी यावेळी करून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्र वाटप व्हायला पाहिजे, असे सांगितले. अंतरवाली सराटीसह राज्यातील मराठा बांधवांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे सांगितले असताना गुन्हे मागे घेतलेले नाही. ते १० फेब्रुवारीच्या आत मागे घ्यावेत, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

हैदराबादचे गॅजेट स्वीकारलेले नसून ते स्वीकारून त्याला शासकीय नोंदणीचा दर्जा देणे आवश्यक आहे. सगेसोयरेबाबत दिलेली अधिसूचना टिकविण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आरक्षणामध्ये यशस्वी झाल्यानंतर रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. त्यामुळे आज ते रायगड किल्ल्यावर दर्शनासाठी आले असल्याचे सांगितले. यावेळी किल्ल्यावरील शिरकाई देवीचे दर्शन देखील त्यांनी यावेळी घेतले. महाराजांना ते नतमस्तक झाले.