आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या घेतला अखेरचा श्वास,एकनाथ शिंदेंना बंडावेळी दिलेली साथ

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल बाबर यांनी सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. अनिल बाबर यांनी दु्ष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला. शिवसेनेतील फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

अनिल बाबर यांना त्रास होत असल्यानं सांगलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगलीच्या राजकारणात गेल्या जवळपास ५० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अनिल बाबर यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून १९७२ मध्ये काम केलं. गार्डी गावचे संरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं. अनिल बाबर यांनी १९९०, १९९९, २०१४, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.
पवारांविषयी अनेकांत असंतोष, पक्षात निवडणुका नव्हे, थेट नेमणुका, दादा गटाच्या नेत्याचा दावा
अनिल बाबर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला. अनिल बाबर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाणी प्रश्नांसाठी संघर्ष केला. अनिल बाबर यांनी खानापूर आटपाडी या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला होता. टेंभू योजनेसाठी त्यांनी सातत्यानं आवाज उठवला होता.
शरद पवार यांना धक्का, ४० वर्षांपासून सोबत असलेल्या बेनके कुटुंबाचा ‘रामराम’, अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय
अनिल बाबर यांचं न्यूमोनिया झाल्यानं निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अनिल बाबर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते, कुणाला दुखवायचं नाही, माझं काम आणि मी अशी त्यांची भूमिका होती. मित्र आणि मृदभाषी सहकारी आपल्यातून निघून गेला, अशी आमची भावना आहे, असं संजय शिरसाट म्हणाले. हा आम्हाला बसलेला मोठा धक्का आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाहीRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

anil babarAnil Babar NewsAnil Babar Passed AwaySangli newsshivsena newsअनिल बाबरअनिल बाबर यांचं निधनशिवसेना बातम्या
Comments (0)
Add Comment