या कुटुंबांना वैशाली यादव यांनी किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रियेबद्दलची संपूर्ण प्रक्रिया व उपचारांबद्दलची माहिती दिली. त्यानुसार या कुटुंबांनी कृष्णा हॉस्पिटलमध्येच आपल्या मुलांवर किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पक्का केला.
धाराशिव जिल्ह्यातील एका खेड्यात वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे १८ वर्षीय रामचे आईवडील! आणि दुसरीकडे अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात ऊसतोड मजूर म्हणून राबून कुटुंबाचे पोट भरणारे २३ वर्षीय लक्ष्मणचे वडील! (रुग्णांची नावे बदलली आहेत)
रामसाठी त्याच्या आईने तर लक्ष्मणसाठी त्याच्या वडिलांनी आपली एक किडनी मुलांना देत या संकटातून बाहेर काढत पुनर्जन्म दिला. ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करून, किडनी दान करणाऱ्या माता व पित्याची किडनी काढण्यात आली. दुर्बिणीद्वारे जिवंत दात्याची किडनी काढणे कौशल्याची बाब होती आणि कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या सहज साध्य केली. त्या दोन्ही रुग्णांना नुकताच कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, चौघेही सुखरूप आहेत. ही सत्य घटना कृष्णा हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडलीय.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. आर. जी. नानिवडेकर यांच्या निर्देशानुसार किडनी ट्रान्स्प्लान्ट सर्जन डॉ. अमोलकुमार पाटील, युरॉलॉजिस्ट डॉ. योगेश जाधव, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील या तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय टीमसह अन्य सहकाऱ्यांनी एकाच दिवशी कृष्णा हॉस्पिटलमध्ये या दोघांवर किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.दरम्यान, कराडच्या कृष्णा हॉस्पिटलद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांची आरोग्य सेवा केली जात आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News