हिंमतच कशी होते? शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर भाजप आमदाराचा हल्लाबोल, ठाण्यात भडका उडणार

ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात शिवसेनेने (शिंदे गट) कंटेनर शाखा उभारल्या आहेत. आता या शाखांच्या ‘कंटेनर’ना भाजप आमदार संजय केळकर यांनी विरोध केला आहे. घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून अशीच एक कंटेनर शाखा उभारल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे.

या प्रश्नी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत ही कंटेनर शाखा हटवण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. अन्यथा त्याशेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालये थाटण्याचा इशाराही त्यांनी दिल्याने येत्या काळात ठाण्यात ‘कंटेनर शाखां’वरून वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे फोटो भाजप आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. २०२१ साली याच जागेवर कपाऊंड टाकून लोकोपयोगी मूलभूत सोयी सुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती.

पाच वर्षांत महाराष्ट्राने गमावले दहा लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार पदावर असतानाच अखेरचा श्वास
पालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही २४ जानेवारी रोजी या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवून २७ जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा व फलक लावल्याचे केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना निदर्शनास आणून दिले. या प्रकारानंतर आयुक्तांनी तत्काळ संबंधितांशी संपर्क साधून कारवाईचे आदेश दिल्याचे केळकर यांनी सांगितले.

मतदार राजा, एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाची बॅनरबाजी

हिंमतच कशी होते? केळकरांचा सवाल

शहरातील विविध भागात राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी? तेव्हा, तातडीने ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी, अन्यथा या ठिकाणी दोन प्रतिकात्मक कार्यालये थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे. शहरात तुळशीधामप्रमाणे शिवाईनगर, घोडबंदर रोड, सुभाषनगर येथेही रस्त्याच्या कडेला पदपथावर या कंटेनर शाखा उभारण्यात आल्या असून मीरा – भाईंदरमध्येही या शाखांचा वाद काही दिवसांपूर्वी उफाळून आला होता.

CM Shinde यांना दणका, Shivsena पदाधिकाऱ्यांचा Raj Thackeray यांच्या उपस्थितीत MNS मध्ये जाहीर प्रवेश

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

CM Eknath Shindesanjay kelkarshivsena container shakhashivsena vs bjpThane newsएकनाथ शिंदेठाणे बातम्याशिवसेना कंटेनर शाखाशिवसेना विरुद्ध भाजपसंजय केळकर
Comments (0)
Add Comment