प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या ‘फायटर’ने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. २२.५ कोटी रुपयांपासून सुरू झालेल्या या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी ३९.५ कोटींची कमाई केली. यानंतर सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण दिसून आली. रविवारी २९ कोटींची कमाई केली होती.
‘फायटर’ने मंगळवारी ७.७५ कोटींची कमाई
sacnilk च्या अहवालानुसार, मंगळवारी या चित्रपटाची कमाई आणखी घसरली असून ती केवळ ७.७५ कोटी झाली. एकूण ६ दिवसांत चित्रपटाने १३४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘फायटर’ची जागतिक कमाई २२२ कोटींच्या पुढे
या चित्रपटाने जगभरात २२२ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने ५ दिवसांत २१५.८० कोटी रुपयांची कमाई केली असून परदेशात आतापर्यंत ६५ कोटींहून अधिक कमाई केली.
‘फायटर’ वॉरच्या मागे
हृतिक रोशन, दीपिका पादुकोण व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर, आशुतोष राणा, करण सिंग ग्रोव्हर सारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटापूर्वी गेल्या वर्षी २५ जानेवारीला सिद्धार्थ आनंदचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती. सिद्धार्थ आनंदच्या ‘वॉर’ या चित्रपटानेही चांगली कमाई केली होती त्यात टायगर श्रॉफ हृतिक रोशनसोबत दिसला होता. ‘वॉर’ने सहाव्या दिवशी २१.५० कोटी रुपयांची कमाई केली आणि ६ दिवसांत या सिनेमाने १८७.७५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने जगभरात २७१ कोटींची कमाई केली होती.
२५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ४२०० स्क्रीन्सवर रिलीज
सुमारे २५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट देशभरातील सुमारे ४२०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशनशिवाय दीपिका पादुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, ऋषभ साहनी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.