‘Aadhaar Card वर २ टक्के व्याजदराने मिळत आहे कर्ज’; असा मेसेज आल्यास सावधान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

अनेकांच्या फोनवर एक नवीन एसएमएस येत आहे, ज्यात लिहिण्यात आलं आहे की सरकारच्या एका योजनेच्या अंतर्गत स्वस्त व्याजदरात कर्ज दिलं जात आहे. या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की तुम्ही फक्त तुमच्या आधार कार्डचा वापर करून कर्ज मिळवू शकता. चला जाणून घेऊया या मेसेज मागील सत्य.

असा आहे मेसेज

फेक मेसेजचा होतोय प्रसार

PIB Fact Check नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितलं आहे की कर्जाचा जो मेसेज फिरत आहे तो बनावट आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेच्या अंतर्गत नागरिकांना आधार कार्डवर लोन दिलं जात नाही. पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘एका फेक मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की सरकारच्या स्कीम अंतगर्त आधार कार्डवर फक्त २ टक्के वार्षिक व्याजवावर कर्ज दिलं जाईल. असा फसवा मेसेज फॉरवर्ड करू नका. हा तुमची खाजगी माहिती चोरण्याचा प्रयत्न देखील असू शकते.’

जय लोकांना असा मेसेज मिळाला आहे त्यांनी या मेसेजचा प्रसार करू नये, असं पीआयबी फॅक्ट चेकनं सांगितलं आहे. कारण हा अत्यंत चुकीचा मेसेज असून अशी कोणतीही योजना सरकारनं आणली नाही ज्यात २ टक्के व्याजदराने कर्ज मिळेल आणि ५० टक्के सबसिडी.

जाणून घ्या धोका

हा मेसेज पाठवणारे scammer असू शकतात आणि तुमच्या खाजगी माहिती चोरू शकतात, जसे की तुमचं नाव, आर्थिक व्यवहार किंवा पॅन नंबर. तसेच तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो.

मेसेज आला तर काय करावे

तुमच्या फोन किंवा ईमेलवर जर असा कोणतीही मेसेज आला तर त्यावर क्लिक करण्याचा किंवा दिलेल्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. त्या मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि डिलीट करून टाका. त्यामुळे तुम्ही स्कॅमरपासून सुरक्षित राहू शकता. अशी चुकीची माहिती फॉरवर्ड करू नका जेणेकरून इतर लोक देखील सुरक्षित राहतील.

Source link

Aadhaar cardfact checkfake messageloan on aadhaar cardआधार कार्डआधार कार्ड लोन
Comments (0)
Add Comment