हायलाइट्स:
- साकीनाका बलात्कार प्रकरणी महापौरींचा धक्कादायक खुलासा
- उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू
- आरोपी आणि पीडिता ओळखत अन्…
मुंबई : मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ तासांहून अधिक काळ पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर उपचार घेत असताना राजवाडी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
मुंबईच्या साकीनाका भागात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आला होता. साकीनाका पोलिसांनी हा गुन्हा करणाऱ्या आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३७६ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोहन चौहान अशा नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पीडितेची भेट घेतली आणि यानंतर माध्यमांशी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी भेट घेतली असता पीडितेच्या प्रकृतीची चौकशी केली. तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु होता. तिला गुप्तागांमध्ये गंभीर इजा झाली होती. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोकाही वाढला होता. डॉक्टर तिच्यावर उपचार करत असून आणि पीडिता मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आरोपी आणि पीडिता एकमेकांशी परिचित
यानंतर या प्रकरणात त्यांनी आणखी काही खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या की, ‘सध्या पीडितेसोबत फक्त तिची आई रुग्णालयात आहे. इतकंच नाहीतर आरोपी आणि पीडिता हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. गेल्या बारा-तेरा वर्षांपासून ते संबंधात होते. ते एकमेकांशी परिचित होते. त्या दोघांची भांडणं सुरू होती. दोघांमध्ये भांडण सुरत हे सांगण्यासाठी लोकांनी तिच्या घरी फोनही केला होता. पण त्यानंतर असा धक्कादायक प्रकार घडेल अशी कोणतीही कल्पना के