लातूर : झरी येथील रहिवासी असलेले २० वर्षीय कृष्णा अर्जुन जाधव त्यांची ४० वर्षीय चुलती कस्तुरा परमानंद जाधव हे दोघेजण आठ दिवसांपूर्वीच खरेदी केलेल्या मोटरसायकलवरुन सकाळी सहा वाजता शेताकडे दूध काढण्यासाठी निघाले. ते उदगीर निलंगा रस्त्यावर आले असता समोरुन येणाऱ्या कंटेनरने अक्षरा किशन जाधव या महिलेला जोराची धडक दिली. धडक दिल्याचं त्यांनी पाहिलं अन् मोटरसायकल जागीच थांबवली. पण कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् कंटेनर वेगात येऊन रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कृष्णा जाधवच्या यांच्या मोटरसायकलवर पलटी झाला.
या विचित्र अपघातात अक्षरा जाधव, कस्तुरबाई जाधव अन् कृष्णा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा विचित्र होता की रस्त्यावर रक्त-मासांचा सडा पडला, अशी महिती प्रत्यक्षदर्शी झरीचे माजी सरपंच दिनकर पाटील यांनी दिली. माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली. दरम्यान, वाहतूक कोंडी निर्माण झाली. महिती मिळताच निलंगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात मयत झालेल्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा ग्रामीण रुग्णालय पाठवण्यात आले आहेत. मयत कस्तुरबाई यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पती असा परिवार आहे. तर कृषा जाधव यांच्या पश्चात आई, वडील, एक बहिण असा परिवार आहे. या घटनेनं झरी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतलं असून निलंगा पोलीस पुढील करवाई करत आहेत.