पुणे : पुणे शहर हे गुन्हेगारीचं मोठं हब बनलं आहे. शहरात मोठ्या संख्येने गुन्हेगारी डोकं वर काढत आहे. टोळीयुद्धपासून ते बाल गुन्हेगारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्हेगारीचं लोण शाळेपर्यंत पोहोचलं आहे. याचा प्रभाव आता शाळकरी मुलांवरही पडत आहे. याचदरम्यान, एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पुण्यात भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात शाळकरी मुलांनी एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दहावीच्या वर्गातील मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत १५ वर्षीय मुलाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलगा महापालिकेच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेली चार मुलं याच परिसरात महापालिकेच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलाची दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे पाहण्यावरून एका मुलाशी वाद झाला होता. त्या मुलाने शाळेतील मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी दुपारी तक्रारदार मुलगा रामोशी गेट परिसरातून घरी जात होता. त्यावेळी चौघांनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ केली.
“तुला मस्ती आली का?” असं म्हणत मुलाला साखळी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. त्याच्या छातीवर चाकूने वार केला. त्यावेळी नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामोशी गेट चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. जखमी झालेल्या मुलावर ससून रूग्णालयात उपचार सुरु आहेत.