सातारा: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ‘क्राफ्ट इन्स्ट्रक्टर’ (शिल्प निदेशक) या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत साताऱ्यातील गौरी जीवन पाटील ही मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
‘क्राफ्ट इन्स्ट्रक्टर’ या पदाची पूर्व परीक्षा सप्टेंबर २०२२ आणि मुख्य परीक्षा जून २०२३ मध्ये घेण्यात आली होती. राज्यातील एकूण ५५ हजार इंजिनियर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. गौरी पाटील ही ‘मेकॅनिक मोटार व्हेईकल’, या ट्रेडमध्ये मुलींमध्ये राज्यात प्रथम तर ‘टर्नर’ या ट्रेडमध्ये राज्यात दुसरी आली आहे.

गौरी ही मूळची साताऱ्यातील रहिवासी आहे. तिचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झालं आहे. तळेगाव-दाभाडे येथील ॲड. सुरेखा पाटील आणि प्रा. जीवन पाटील यांची ती कन्या तर सातारा सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त शाखा अभियंता घन:श्याम पवार, मंजुश्री पवार यांची ती स्नुषा आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.