म. टा. प्रतिनिधी, पुणे: उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुण्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. शहरात गुरुवारी सकाळी १०.९ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. कोथरूड, कर्वेनगरसह लगतच्या भागात पारा १० अंशांपेक्षाही खाली घसरला होता. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे पुण्यात गेल्या १५ दिवसांपासून किमान तापमानात चढउतार सुरू आहेत. या हंगामातील नीचांकी तापमान ८.६ अंश सेल्सियस २५ जानेवारीला नोंदविण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवस तापमानाचा पारा १० अंशांवर रेंगाळला होता. त्यानंतर थंडीचा जोर ओसरल्याची चर्चा असतानाच बुधवारी रात्रीपासून पुन्हा हवेतील गारवा वाढला. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत १०.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

उपनगरांतही कडाक्याची थंडी होती. दहानंतर हवेतील गारवा कमी झाला. दिवसभरात ३० अंश सेल्लिअस कमाल तापमान नोंदवले गेले. दिवसभर हवेत गारवा नव्हता. पुण्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली. राज्यातील नीचांकी तापमान १०.६ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदवले गेले. हवामानातील अनुकूल घडामोडींमुळे पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात तापमानात घट होणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.
पुण्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
शिवाजीनगर १०.९
एनडीए ९.८
हवेली ९
पाषाण १२
वडगाव शेरी १८.४
कोरगाव पार्क १६.३
चिंचवड १६.९