हायलाइट्स:
- ऐन गणेशोत्सवात राज्यावर आस्मानी संकट
- मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
- १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढणार
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा (Rain in Maharashtra) दिला आहे. पुढील काही तासांत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने जाताना दिसत आहे. त्यामुळे, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक भागात दिसून येईल आणि राज्यभरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी (IMD Alert and Weather Forecast for Maharashtra)होण्याची शक्यता आहे. (weather today at my location rain in maharashtra and mumbai imd alert weather forecast update)
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला. गणेशोत्सवाच्या दरम्यान, विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीसह कोकणात, इतर भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. पश्चिम-मध्य महाराष्ट्रातही याच काळात काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर विदर्भातील नागपूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईतही गेल्या २४ तासांत सतत पाऊस
गेल्या २४ तासांपासून मुंबईत सतत पाऊस सुरू आहे. सकाळी, काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मुंबईत पाऊस असाच राहणार असून जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. दरम्यान, यामुळे मुंबईची पुन्हा तुंबई होऊ शकते. ऐन गणेशोत्सवात पावसाने जोर धरल्याने भक्तांमध्ये नाराजीचा सुरू आहे.
रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट (Ratnagiri Orange Alert)
भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे, पुढील ४-५ दिवस, संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार किंवा खूप मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (weather today at my location rain in maharashtra and mumbai imd alert weather forecast update)