पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच शिलेदार शर्यतीत, राज ठाकरेंकडे लेकाने सोपवली यादी, दावेदार कोण?

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना आता राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपल्या नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने मनसेकडून काही मोजक्या जागांवर जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यातीलच एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे पुणे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवली होती. अमित ठाकरे हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे मनसेने पुण्यात जोरदार ताकद लावली आहे.

या अनुषंगाने आता पुण्यातून मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची नावे राज ठाकरे यांना कळविण्यात आली आहेत. पुणे लोकसभेचे प्रभारी असलेले अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे इच्छुकांची नावं सुपूर्द केली आहेत. यामध्ये वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते यांच्या नावांचा समावेश आहे. या नावांमध्ये वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी आपली दावेदारी यापूर्वीच ठोकलेली आहे. तर बाबू वागस्कर, किशोर शिंदे आणि गणेश सातपुते हे देखील पुणे मनसेतील मोठी नावं असल्याने मनसेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी अंतर्गत चुरस पाहायला मिळत आहे.

पाच वर्षांत महाराष्ट्राने गमावले दहा लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार पदावर असतानाच अखेरचा श्वास
पुण्याप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राज्यात ज्या लोकसभा मतदारसंघात मनसे निवडणूक लढवणार आहे, तेथील सर्वच प्रभारींनी इच्छुकांची नावे राज ठाकरे यांच्याकडे दिली आहेत. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे मनसेने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळेच पुण्यात मनसेने जोरदार ताकद लावली आहे. सर्वप्रथम मनसेचे माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची दावेदारी ठोकली होती. त्याच अनुषंगाने त्यांनी शहरभर फ्लेक्सबाजी केली होती. ‘पुण्याची पसंत, मोरे वसंत’ अशा आशयाचे फ्लेक्स लावत वसंत मोरे यांनी वातावरण निर्मिती केली होती.

मतदार राजा, एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाची बॅनरबाजी
आता याच लढाईत वसंत मोरे यांचे कधीकाळचे अगदी जवळचे मित्र आणि महापालिकेतील सहकारी आणि मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचं देखील नाव इच्छुक म्हणून समोर येत आहे. त्याचबरोबर किशोर शिंदे आणि बाबू वागस्कर यांच्यासारख्या बड्या नेत्यांचे नाव लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी समोर आल्याने पुणे मनसेत अंतर्गत चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच उमेदवार ठरवताना पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी असणारे ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांची खरी कसोटी लागणार आहे.

जर खुद्द पंतप्रधान राज्य अन् भाषेवरचं प्रेम लपवू शकत नाहीत, तर तुम्हीच का लपवता? : राज ठाकरे

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

Amit Thackerayloksabha election 2024pune loksabha election 2024raj thackerayVasant Moreअमित ठाकरेपुणे लोकसभा निवडणूकमनसे उमेदवार लोकसभा निवडणूकराज ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment