हा जनसंवाद नाहीत तर मी माझ्या कुटुंबाच्या जवळ हा संवाद साधतोय. हे सगळं माझं कुटुंब आहे. करोना कालावधीत माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मी या सगळ्या आपल्या कुटुंबासाठी राबवली होती. काही जणांना यावरूनसुद्धा पोटदुखी आहे. तुम्ही सगळे मला महाराष्ट्रातील जनता आपल्या कुटुंबातील सदस्य मानता तर काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात ‘हड’ अशी विरोधकांची खिल्ली उडवत, ‘सरकार आपल्या दारी, लोक सांगतात जा तुझ्या घरी’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील सभेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
रायगडचं वारं असं फिरलं नाही तर रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठे सरकारला झोपवले आहे. दिल्लीला, आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे, असा शब्दात रायगडचं कौतुक करत ही भूमी नरवीर तानाजी मालुसरेंची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही भगवा फडकवणारच पण या भूमीत आता झेंडा राहिला बाजूला आणि नॅपकिन फडकवणारेच खूप झाले, अशा शब्दात महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.
इकडे वारकरी संप्रदाय आहे पण यावरून मला बाळासाहेबांनी सांगितलेले एक वाक्य आठवलं की आम्ही सुद्धा वारकरी आहोत आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी. त्याच्यामुळे आपला पंथ एकच, झेंडा एकच, धर्म एकच आहे जो भगवा आपल्या छत्रपतींचा हिंदूंचा आहे, त्या भगव्यामध्ये छेद करणारे व हिंदुत्वामध्ये भेद करणारे भारतीय जनता पक्षाचे गोमूत्रधारी हिंदू आले आहेत, त्यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील सभेत केलं आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News