संघर्षाची कथा! घरची हलाखीची परिस्थिती, मोलमजुरी करत दोन तरुणांची स्वप्नपूर्ती

नांदेड : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट वळण येते. पण, त्यावर मात करून पुढे जात राहणे आणि प्रत्येक पराभवातून शिकणे हाच आपला पुढचा मार्ग ठरतो. मेहनतीचे फळ एक दिवस आपल्याला मिळतेच. हे गणेश विठ्ठल लंगोटे आणि अशोक जयराम गंगासागरे या दोघांनी सिद्ध करून दाखवले आहे. हलाखीच्या परिस्थितीला मात करत या दोन तरुणांनी मोल मजुरी करत आपले स्वप्न गाठले आहे. एकाने हमाली करून पोलीस भरतीत यश मिळवले, तर दुसरा हॉटेलमध्ये वेटरचे काम करून न्यायालयात शिपाई झाला आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
तुमच्या पाठीमागे बाळासाहेब उभे राहिले हे विसरू नका, उद्धव ठाकरेंनी मोदींना ‘इतिहास’ सांगितला
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक गंगासागरे हा जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गौरी शेळगाव येथील रहिवासी आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील हे बूटपॉलीशचं काम करतात, तर आई मोलमजुरी करते. अशोकचं शिक्षण बी.ए डी.एड पर्यंत झालं आहे. २०१५ साली त्याने गाव सोडून नांदेडमध्ये हॉस्टेलमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. अॅकडमी लावण्यासाठी पैसे नसल्याने त्याने हमालीचं काम सुरु केलं. तब्बल आठ वर्ष तो नवीन मोंढा परिसरातील कृषी उत्पन्न बाजार येथे सकाळ पासून खांद्यावर पोते वाहून मोलमजुरीचं काम करत होता.

दिवसाकाठी त्याला दोनशे ते तीनशे रुपये मजुरी मिळायची. याच पैशातून त्याने अॅकडमी जॉईन केली. सकाळी हमाली आणि सायंकाळी तो अभ्यास करायचा. आतापर्यंत त्याने अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. मात्र त्याला यश आलं नाही. तरी सुद्धा खचून न जाता त्याने मुंबई महाराष्ट्र सुरक्षा फोर्समध्ये पोलीस कॉन्टेबल पदासाठी परीक्षा दिली. ग्राउंड आणि लेखीमध्ये चांगले मार्क घेतल्याने त्याची पोलीस कॉस्टेबल पदासाठी निवड झाली.

पहिल्या दिवसापासून मी पुणे लोकसभेतून इच्छुक, वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं

तर दुसरीकडे गणेश लंगोटेचा प्रवास देखील संघर्षाचा आहे. हॉटेलमध्ये वेटर आणि त्यानंतर शोरूममध्ये काम करून त्याने नांदेडच्या न्यायालयात शिपाई पदी मजल मारली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिपाई पदाच्या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला आहे. गणेशचं शिक्षण एम.ए पर्यंत झालं आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने तो वर्ष २००३ पासून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. पहाटे चार ते सकाळी अकरा वाजेपर्यंत तो तिथे काम करतो. त्यानंतर एका शोरूममध्ये कामाला जातो. वेळ मिळेल तेव्हा तो अभ्यास देखील करायचा. वडील नसल्याने घरातील जवाबदारी गणेश आणि त्याच्या भावावर होती. तब्बल २० वर्ष संघर्ष करत अखेर त्याने शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यांच्या या संघर्षाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

Source link

ashok jairam gangasagre newsganesh vitthal langote newsnanded newsअशोक जयराम गंगासागरे बातमीगणेश विठ्ठल लंगोटे बातमीनांदेड बातमी
Comments (0)
Add Comment