गोवा, उत्तर प्रदेशमध्ये महाविकास आघाडीसारखा प्रयोग?; संजय राऊतांनी दिले संकेत

हायलाइट्स:

  • भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेची खेळी
  • गोवा, उत्तर प्रदेशमध्ये लढणार
  • महाविकास आघाडीसारखा प्रयोग होणार

मुंबईः आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी शिवसेनेनं हालचाली सुरू केल्या आहेत. गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गोव्यात शिवसेना २०- २१ जागा लढणार असून तिथंही महाविकास आघाडीसारखा प्रयोग केला जाऊ शकतो, असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहेत.

‘गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात २० ते २१जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही ८० ते १०० जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो,’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

वाचाः उत्तर प्रदेश निवडणूकः भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची खेळी

‘उत्तर प्रदेश निवडणुकांबाबतही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू,’ असंही राऊतांनी सांगितलं.

वाचाः मुंबईत सील केलेल्या इमारतीतील रहिवाशांच्या होणार आरटी-पीसीआर चाचण्या

चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. ठाकरे यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असं सरकारमधील एका मंत्र्यानं म्हटलं असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावं,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

वाचाः महाराष्ट्रात आजपासून सलग तीन दिवस पावसाचा जोर; या जिल्ह्यांना अलर्ट

Source link

goa assembly elections in 2022sanjay raut latest updateSanjay Raut Newsshiv sena latest newsshivsena in uttar pradeshuttar pradesh assembly elections in 2022उत्तर प्रदेश निवडणूकगोवाशिवसेना
Comments (0)
Add Comment