मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला आता पुन्हा उपोषण का? अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर आता जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे. मुंबईत जाऊन मराठा समाजाला काय मिळाले आणि काय नाही मिळाले हे एखाद्या घटना तज्ञाला विचारून घ्या. काही जण सरकारची सुपारी घेऊन बोलत आहेत. जे मिळाले तो गोर गरिबाला मिळाले. तुम्हाला काहीही मिळाले नाही म्हणून पोटात दुखते. तुम्हाला पद, पैसा हवा होता तो मिळाला नाही.गर्दी आणि समीकरण यामुळे देखील मुंबईत अनेकांच्या पोटात दुखू लागले. आधी मराठे यांच्या पाठिशी उभे होते तेव्हा त्यांना ते चांगले वाटत असे. आता मराठे हे मराठ्यांसाठी उभे राहिलेत. त्यामुळे समीकरण बदलले आहे.
एखाद्या शब्दाचे कायद्यात रुपांतर करायचे असेल तर काय प्रक्रिया असते हे तज्ञाला बोलवून विचारून घ्या. अध्यदेश काढावा लागतो का, अधिसूचना काढावी लागते का, त्यानंतर कायदा करता येतो का की गेल्या गेल्या कायदा करता येतो, हे विचारून घ्या. मराठा समाजामध्ये गैरसमज पसरू नका. तुम्हाला मराठा समाज मानत होता आणि तुम्ही दोनदा काड्या केल्या, असे जरांगे पाटील म्हणाले.
सुपारी घेऊन बोलू नका
मी मराठा समाजाचे काम करतोय ही बऱ्याच जणांची पोटदुखी आहे. मी बाजूला व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. पण माझी राज ठाकरे साहेबांना विनंती आहे की, आमचा समाज तुम्हाला खुप मानतो उगाच समाजात गैरसमज पसरूव नका. मी देखील तुम्हाला मानायचो. हे सरकारची सुपारी घेऊन बोलल्या सारखे बोलणं तुम्हाला शोभत नाही. आमच्या समाजातील पोरांना कळते आरक्षण म्हणजे काय, त्याची प्रोसेस काय. आमच्यात फूट पाडण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आरक्षणाबद्दल न बोललेले तुमच्यासाठी चांगले राहील, अशी माझी विनंती आहे.